Nagpur News : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) राज्यातील २१ जिल्ह्यांत राबविण्यात येत आहे. यामध्ये पूर्व विदर्भातील २७४८ तर नागपूर जिल्ह्यातील ५६३ गावांचा समावेश आहे. या योजनेतून शेती, शेतकरी समृद्ध करण्याचा प्रयत्न होणार आहे.
बदलत्या हवामानात शेतकऱ्याला अनेक अडचणीला तोंड द्यावे लागते. शेतकऱ्यांच्या उत्पादन आणि उत्पन्नात जोखीम वाढली आहे. या बाबीचा विचार करूनच ‘पोकरा’ची आखणी केली आहे. योजनेसाठी जिल्ह्यातील अठराशेवर गावांचे शासनाने नेमलेल्या समितीकडून सर्व्हेक्षण झाले. गावाच्या निवडीसाठी विविध निकष होते.
ज्यामध्ये पडणारा पाऊस, उत्पादकता, पाण्याची स्थिती, ग्रामस्थांची आर्थिक स्थिती, समस्या आदींचा यात समावेश होता. त्यात निकषात कमी ठरलेल्या या ५६३ गावांची निवड करण्यात आली. त्याअंतर्गत सर्व गावांमध्ये सरपंचाच्या अध्यक्षतेखाली ग्राम कृषी विकास समितीची स्थापना केली. ११ सदस्यीय समितीत सदस्य सचिव म्हणून ग्रामसेवक नेमले गेले.
समितीमार्फत गावातील कामांचे सुक्ष्म नियोजन करण्यात आले. समितीलाच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कामांना मंजुरीचे अधिकार प्रदान असून, शेतीविषयक नवे संशोधन, पाण्याचा काटेकोर वापर, शेतीमधील कर्ब नियंत्रण, कार्बन क्रेडिट सुविधा आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
तसेच भरडधान्य उत्पादन, हवामान अनुकूल तंत्रज्ञान, संवर्धित व पुनरुज्जीवित या हवामान शेती पद्धतीचा वापर करून पिकांची उत्पादकता वाढविणे आदी बाबींवरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
योजनेत समाविष्ट बाबी
मृद व जलसंधारण आणि भूजल पुनर्भरण (पाण्याचा ताळेबंद)
पाण्याचा कार्यक्षम वापर
जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन
फळबाग वृक्ष व बांबू लागवड
हवामान अनुकूल तंत्रज्ञान
कृषी पूरक व्यवसाय
काढणीपश्चात व्यवस्थापन व कृषी मूल्य साखळीचे बळकटीकरण
सेंद्रिय व जैविक निविष्ठा तयार करणे, बियाणे व धान्य प्रक्रिया युनिट
पर्यावरण सुरक्षितता
योजनेतील महत्त्वाच्या बाबी
३ वर्षांचा आराखडा तयार करण्यात येणार
६० टक्के अनुदानावर योजनेची अंमलबजावणी
पाणलोट आधारित होणार कामे
कृषी ताई समन्वय साधण्याचे करणार काम
तालुकानिहाय समाविष्ट गावांची संख्या
नागपूर (ग्रा.) ४७, कामठी २५, हिंगणा ५२, सावनेर ३७, काटोल ६०, नरखेड ४४, कळमेश्वर ३२, रामटेक ४३, पारशिवनी ३३, उमरेड ५४, मौदा ३५, कुही ४९ आणि भिवापूर तालुक्यातील ४२ गावांचा योजनेत समावेश आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.