Namo Installment Agrowon
ॲग्रो विशेष

Namo Installment : नमोचा हप्ता शनिवारीपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणार; कृषी विभागाची माहिती

Namo Shetkari Installment : नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेंतर्गत ५ हप्ते वितरित करण्यात आले आहेत. राज्यातील ९० लाख ८६ हजार पात्र लाभार्थींना ८ हजार ९६१ कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे, असंही कृषी विभागाने स्पष्ट केलं आहे.

Dhananjay Sanap

Namo 6th Installment : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचं वितरण अखेर कृषी विभागाकडून २९ मार्चपासून सुरू करण्यात येणार असून ३१ मार्च २०२५ पर्यंत शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे, असं कृषी विभागाने सांगितलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नमोच्या सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहाव्या हप्त्यासाठी निधी मंजूर केला आहे. परंतु शेतकऱ्यांना बँक खात्यात रक्कम कधी जमा होणार याबद्दलची उत्सुकता होती. याचबद्दल कृषी विभागाने वितरणाची प्रक्रिया पूर्वतयारी पूर्ण केली असून शनिवारी म्हणजे २९ मार्चपासून निधी वितरित करण्यात येणार आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेंतर्गत ५ हप्ते वितरित करण्यात आले आहेत. राज्यातील ९० लाख ८६ हजार पात्र लाभार्थींना ८ हजार ९६१ कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे, असंही कृषी विभागाने स्पष्ट केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बिहारमधील भागलपुर येथील कार्यक्रमात पीएम किसानच्या १९ हप्त्याचं वितरण करण्यात आलं. त्यामध्ये महाराष्ट्रातील ९२ लाख ८९ हजार शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला. त्यासाठी १ हजार ९६७ कोटी १२ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा निधी केंद्र सरकारच्या पीएम किसानच्या पत्र लाभार्थींना दिला जातो.

तसेच केंद्र सरकार पीएम किसानच्या ६५ हजार ४७ लाभार्थींना लाभ देण्याचं नियोजन केलं. त्यानुसार राज्य सरकारने ९३ हजार २६ लाख शेतकरी कुटुंबाच्या सहाव्या हप्त्यासाठी २ हजार १६९ कोटी रुपयांचा निधी शनिवारपासून जमा करण्याची तयारी केली आहे.

दरम्यान, राज्य सरकारने २०२३ पासून राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची सुरुवात केली. या योजनेतून केंद्र सरकारच्या पीएम किसानच्या धर्तीवर शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये लाभ देण्यात येतो. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेचा वार्षिक लाभ ३ हजार रुपये वाढ करण्याची घोषणा केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Pumps Power Connections: महावितरणकडून १३ हजारावर कृषीपंपांना वीजजोडण्या

Sugarcane Smut Disease: उसावरील चाबूक काणी रोगाचे नियंत्रण कसे करावे?

Kharif Crop Loan Rates: नांदेडला पिकांसाठी पीककर्ज दर निश्चित

Organic Fertilizers: सेंद्रिय खतांमुळे जमिनीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता कशी वाढते?

Mohol-Tandulwadi Highway Project: मोहोळ-तांदूळवाडी महामार्गावरून सोलापुरात ‘श्रेयवाद’

SCROLL FOR NEXT