Paddy Transplanting: आठवडाभर झालेल्या पावसामुळे ओलावलेले शेत आता उन्हाने कोरडे पडले आहे. त्यामुळे माळरानावरील पिके तहानली असून, भात पुनर्लागणीची कामेही खोळंबली आहेत. बागायती भागातील पिके आणखी आठवडाभर तग धरू शकतील; मात्र माळरानातील पिकांसाठी पुढील दोन-तीन दिवसांत पाऊस झाला नाही, तर ती माना टाकण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे..यंदा मॉन्सूनच्या लहरीपणामुळे पेरणीचे तीन टप्पे पडले. मॉन्सूनपूर्व पावसानंतर झालेल्या पेरणीची उगवण चांगली झाली. जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे दुसऱ्या टप्प्यातील पेरणी व काही भागात भात पुनर्लागणी झाली. मात्र तिसऱ्या टप्प्यातील पेरणी आणि भात पुनर्लागणीसाठी आता पावसाची प्रतीक्षा आहे..Paddy Nursery Update: भाताच्या ५८६१ हेक्टरवर रोपवाटिका.दरम्यान, ९ जुलैनंतर पावसाने पाठ फिरवली आहे. ढगाळ वातावरणाऐवजी कडक उन्हामुळे अवघ्या तीन दिवसांत जमिनीतील ओल नष्ट झाली. हिरण्यकेशी नदीच्या उत्तरेकडील शेंद्री, हनिमनाळ, बड्याचीवाडी, वडरगे तसेच आजरा तालुक्यातील बहिरेवाडी परिसरातील माळरानात परिस्थिती गंभीर आहे..सोयाबीन व भाताच्या पिकांची वाढ खुंटली असून, उगवलेल्या पिकांत आंतरमशागतीची कामे सुरू आहेत. मात्र आणखी दोन-तीन दिवस पाऊस झाला नाही, तर पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अलीकडे भात रोपलागवडीचे प्रमाण वाढले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी रोपे तयार केली; मात्र पावसाच्या अनियमिततेमुळे लागवडीसाठी योग्य वेळी ओल मिळाली नाही..Paddy Replanting Delayed: सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवड रखडली.२८ पैकी १९ हजार हेक्टर पेरणीतालुक्यात भात, भुईमूग, सोयाबीन, नाचणी, तूर, मूग, मका आणि ज्वारीची सुमारे २८ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी होते. मात्र पावसाच्या लहरीपणामुळे जुलैचा मध्य उलटूनही १९ हजार २२५ हेक्टर क्षेत्रातच पेरणी झाली आहे. विशेषतः भात आणि सोयाबीनच्या क्षेत्रात घट झाली आहे..चांगली ओल झाल्यानंतर भात आणि सोयाबीनची पेरणी केली. मात्र माळरानातील जमीन अवघ्या दोन दिवसांच्या उन्हाने कोरडी पडली. पिकांची वाढ खुंटली असून काही ठिकाणी उगवणही झालेली नाही. तातडीने पाऊस झाला नाही, तर पिके धोक्यात येतील.विशाल रोटे, हाळलक्ष्मीनगर (वडरगे रोड).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.