Agriculture Development: ‘कृषी’च्या पूर्ण क्षमतेचा वापर आपल्याला करावा लागेल: पंतप्रधान मोदी

PM Modi Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्राच्या संपूर्ण क्षमतेचा उपयोग करून मोठे उद्दिष्ट गाठण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. अर्थसंकल्पानंतर आयोजित वेबिनारमध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांवर प्रकाश टाकला.
PM Narendra Modi
PM Narendra ModiAgrowon
Published on
Updated on

New Delhi News: देशात मोठे उद्दिष्ट गाठण्यासाठी आपल्याला कृषी क्षेत्राच्या पूर्ण क्षमतेचा वापर करावा लागेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले.केंद्रीय अर्थसंकल्पपश्‍चात ‘कृषी क्षेत्राचा विकास आणि ग्रामीण भागाची समृद्धी’ याविषयावर शनिवारी (ता. १) आयोजित वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.

पंतप्रधान श्री. मोदी म्हणाले, ‘‘शेती ही देशाच्या विकासाचे प्राथमिक इंजिन आहे. देशाच्या संपूर्ण कृषी क्षमतेचा वापर करून आणखी मोठे उद्दिष्ट गाठण्याची आवश्यकता आहे. कोणताही शेतकरी मागे राहू नये असे आमचे ध्येय आहे.’’

PM Narendra Modi
PM Narendra Modi: मोदींचे विमान पाऊण तास पाकिस्तानच्या हवाई हद्दीत!

पंतप्रधान मोदी म्हणाले...

१) शेतकऱ्यांना सक्षम बनविण्याकरिता केंद्र सरकार वचनबद्ध आहे. प्रत्येक शेतकऱ्याला पुढे घेऊन जाणे आणि त्यांना आवश्यक असलेला सहकार्य देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

२) पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून ११ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे ३.७५ लाख कोटी रुपये गेल्या सहा वर्षांत दिले गेले.

PM Narendra Modi
Agriculture Transport: शेतीमालाच्या दळणवळणाचे धोरण

३) कृषी उत्पादन यंदा विक्रमी पातळीवर आहे. गेल्या १० वर्षांत, उत्पादन २६५ दशलक्ष टनांवरून ३३० दशलक्ष टन, तर फलोत्पादन ३५० दशलक्ष टनांपेक्षा जास्त झाले आहे.

४) शेतीतील यशासाठी ‘बियाण्यांपासून बाजारापर्यंत’ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

५) सर्वांत कमी कृषी उत्पादकता असलेल्या १०० जिल्ह्यांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ‘पीएम धन-धान्य कृषी योजना’ सुरू केली आहे.

६) पोषणाविषयी वाढत्या जागरूकतेमुळे फलोत्पादन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्यपालन उत्पादनांची मागणी वाढत आहे. फळे आणि भाजीपाला उत्पादनाकरिता आम्ही विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत.

७) २०१९ मध्ये सुरू झालेल्या पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेमुळे मासेमारी उत्पादन आणि निर्यात दुप्पट झाली आहे.

८) सरकारचे ३ कोटी लखपती दीदी निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे, ज्यामध्ये १.२५ कोटीहून अधिक महिलांनी हा टप्पा आधीच गाठला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com