Election Commission of India Agrowon
ॲग्रो विशेष

Name Change Of Constituency : राज्यातील पाच विधानसभा अन् तीन लोकसभा मतदारसंघाच्या नावात बदल होणार

Ahmednagar, Aurangabad, Osmanabad Constituency Name Change : राज्यात विधानसभा निवडणूकांचा बिगुल वाजला असून निवडणूक आयोगाने डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघ पुनर्रचनेनंतरच काही मतदार संघाच्या नावात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यातील शहरांची आणि काही जिल्ह्यांची नावे बदलण्यात आली आहेत. यानंतर आता राज्यातील विधानसभा आणि लोकसभा मतदार संघाच्या नावात बदल केले जाणार आहेत. राज्यातील ५ विधानसभा मतदारसंघासह ३ लोकसभा मतदारसंघाचा यात समावेश आहे. हा बदल केंद्रीय निवडणूक आयोग (Central Election Commission) मतदारपूर्नरचनेनंतर करणार आहे.

५ विधानसभा मतदारसंघ कोणते?

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदारपूर्नरचनेनंतर संभाजीनगर जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांच्या नावामध्ये बदल (Constituency Name Change) करण्याची शक्यता आहे. यामध्ये औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद पूर्व या मतदारसंघाची नावे बदणार आहे. अहमदनगरशहर विधानसभा मतदारसंघाचे अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघ, उस्मानाबाद मतदारसंघाचे नाव धाराशिव विधानसभा मतदारसंघ केले जाईल.

लोकसभेच्या तीन मतदारसंघ

त्याचप्रमाणे लोकसभेच्या तीन मतदारसंघाच्या नावात देखील बदल केला जाणार असून यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे नाव अहिल्यानगर केले जाईल. औरंगाबाद मतदारसंघाचे छत्रपत्री संभाजीनगर, उस्मानाबाद मतदारसंघाचे धाराशिव लोकसभा मतदारसंघ असे नामकरण केले जाणार आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर मतदारनोंदणी मोहीम राज्यभर करण्यात आली होती. ज्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सुमारे १० हजार मतदारांची भर पडल्याचा दावा काही राजकीय पक्षांनी केला होता. तसेच याबाबत निवडणूक आयोगाच्या पत्रकारपरिषद आणि आयोगाकडे प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावरून देखील राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्टीकरण दिले आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर २०२४ मसुदा मतदार यादी ६ ऑगस्ट २०२४ रोजी दुसर्‍या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रकाशित केली आहे. वेळापत्रकानुसार दावे आणि हरकती सादर करण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. दावे आणि हरकतींचा योग्य विचार केल्यानंतरच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आल्याचेही राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Seed : कांदा बियाण्यांसाठी पुन्हा शोधाशोध सुरू

Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले

Cotton Crop Damage : कापसाच्या नुकसानीकडे विमा कंपनीची डोळेझाक

Crop Damage : मॉन्सूनोत्तर पावसाचा ३८ हजार हेक्टरला फटका

Crop Damage : आभाळच फाटलंय, सांगा कसं जगायचं?

SCROLL FOR NEXT