Election Commission : राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश; प्रचार आणि रॅलीत मुलांचा वापर टाळा

Use of Children In Elections : निवडणूक लागल्या किंवा जाहीर झाल्या की राजकीय पक्षांकडून कार्यकर्ते कामाला लावले जातात. पक्षाच्या प्रचारात पोस्टर्स लावणे, पॅम्प्लेट वाटप, प्रचार रॅली आणि सभांमध्ये लहान मुलांचा वापर केला जातो. याला आता चाप बसणार आहे.
Election Commission
Election CommissionAgrowon

Pune News : देशात काहीच महिन्यात लोकसभा निवडणुका लागणार आहेत. याच्याआधी सर्वच राजकीय पक्ष हे आपआपल्या तयारीला लागले असून उमेदवार आणि मतदारसंघाच्या चाचपणीस लागले आहेत. यादरम्यान निवडणूक आयोगाने येत्या लोकसभा निवडणूकांच्या अनुशंगाने देशातील सर्वच राजकीय पक्षांसाठी नियमावली जारी केली आहे. तसेच राजकीय पक्षांनी त्यांच्या प्रचारसभा, रॅलीत लहान आणि अल्पवयीन मुलांचा वापर टाळावा असे निर्देश दिले आहेत. तसेच या नियमांचा भंग केल्यास कायदेशील कारवाई केली जाईल असाही इशारा दिला आहे. यामुळे आता राजकीय पक्षांकडून होणाऱ्या लहान मुलांच्या वापरास चाप लागणार आहे.

देशात निवडणूका लागल्या की सगळ्यात आधी लहान मुलांच्या हातात प्रचाराचे पोस्टर्स, पॅम्प्लेट आणि खांद्यावर पक्षाचे झेंडे दिसतात. त्यांचा वापर घोषणा देण्यासाठी होतो. अशा वेळी निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना ताकीद दिली आहे. तसेच लहान किंवा अल्पवयीन मुलांना घोषणा द्यायला लावू नका, त्यांचा प्रचारात वापर करू नका असे म्हटले आहे. पण जर कोणी हे आदेश न पाळल्यास निवडणूक आयोगाच्या नियमांचा तो भंग असेल असेही म्हटले आहे.

Election Commission
Udhhav Thackeray : केंद्रीय निवडणूक आयोग बरखास्त करा

तसेच , राजकीय पक्षांनी कोणत्याही निवडणुकीत लहान मुलांचा रॅली, घोषणाबाजी, पोस्टर्स वाटप यासाठी सहभागी करून घेऊ नका त्यांनी यापासून दूर ठेवा असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच या निर्देशानुसार आता राजकीय नेते किंवा उमेदवारांना त्यांच्या प्रचार किंवा रॅलीत आपल्या वाहनात लहान मुलाला घेता येणार नाही.

निर्देश दिले अन् पळवाटही दाखवली

दरम्यान निवडणूक आयोगाने येत्या लोकसभा निवडणूकांच्या अनुशंगाने राजकीय पक्षांना निर्देश दिले आहेत. मात्र यावेळी आयोगानेच यातील पळवाट ही दाखवली आहे. आयोगाने दिलेल्या निर्देशात प्रचारसभा किंवा रॅलीत लहान किंवा अल्पवयीन मुले पालकांसोबत असतील तर चालेल यावर कोणतीही कारवाई होणार नाही असे म्हटले आहे.

Election Commission
Loksbha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी सरकारचा शेतकरीविरोधी निर्णयांचा सपाटा! | ॲग्रोवन

काय म्हटले आहे आयोगाने?

निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवेदनात, लहान किंवा अल्पवयीन मुलांनी राजकीय पक्ष किंवा उमेदवाराच्या संदर्भात उच्चारलेले शब्द हे राजकीय प्रचारात येतात. त्यामुळे अशा राजकीय प्रचारात बालकांच्या सहभागावर आयोगाने बंदी घातली आहे.

राजकीय पक्षांना आवाहन

यासंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी देशातील राजकीय पक्षांना आवाहन केले आहे. त्यांनी, राजकीय पक्ष हे निवडणूक आयोगाचे प्रमुख भागधारक असतात. यामुळे त्यांनी लोकशाही मूल्यांचे पालन करण्यासाठी या आवाहनात सक्रिय भागीदार बनावे असे म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com