Kolhapur Market agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Market : कोल्हापूर बाजारात नागपूर संत्रीची रेलचेल; कांदा आणि टोमॅटो काय दर मिळतोय?

Kolhapur Market Onion Rate : बाजार समितीच्या सौदे बाजारात भाजीपाल्याची मागणी अधिक असली तरी किरकोळ बाजारात अपेक्षित उठाव होत नसल्याचे चित्र आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोहाळे मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत.

sandeep Shirguppe

Kolhapur Vegetables Market : कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस थांबल्याने विस्कटलेला भाजीपाला बाजार पुन्हा पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान भाजीपाल्यांची आवकही वाढल्याने दरात चढउतार होत आहे. बाजार समितीच्या सौदे बाजारात भाजीपाल्याची मागणी अधिक असली तरी किरकोळ बाजारात अपेक्षित उठाव होत नसल्याचे चित्र आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोहाळे मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत.

लिंबूच्या किमती शेकडा ५० ते १०० रुपयांनी वाढल्या आहेत. दिवाळीमुळे फूल बाजारही तेजीत येत आहे. निशिगंधाचे भाव गतीने वाढत असून, अन्य फुलांची भाववाढ होत आहे. फळबाजारात आवक थंडावली असून मागणीही शांत आहे. दरम्यान बाजारात सध्या नागपूर संत्री दाखल होऊ लागली आहे. पेरूची आवक वाढली असून लाल, गुलाबी, परदेशी, देशी पेरूच्या विक्री वाढली आहे.

भाजीपाला : टोमॅटो- ५० ते ६०, दोडका-५० ते ६०, वांगी -६० ते ८०, कारली- ४० ते ५०, ढोबळी मिरची- ५० ते ६०, मिरची - ४० ते ५०, फ्लॉवर - ३० ते ४०, कोबी- २० ते ३०, बटाटा- ४० ते ५०, कांदा - ५० ते ५५, लसूण- ३५० ते ४००, आले - १२० ते १६०, लिंबू - २५० ते ६०० शेकडा, गाजर - ४० ते ५०, बीन्स- ६० ते ८०, गवार - १०० ते १४०, भेंडी- ६० ते ८०, देशी काकडी- ७० ते ८०, काटा काकडी - ४० ते ५०, दुधी - ३० ते ४०, कोंथिबीर - २०, मेथी -२५ ते ३०, भाज्या - १५ ते २० पेंढी, शेवगा - १० ते १२.

फुले : झेंडू - ८० ते १००, निशिगंध - १८० ते २००, गुलाब - २२० ते २५०, गलांडा - १०० ते १२०, शेवंती - ८० ते १००, अष्टर - १२० ते १५०.

फळे : सफरचंद - २२० ते ४००, संत्री - १२० ते १३०, मोसंबी- ८० ते १००, डाळिंब- २०० ते ३००, चिकू- १०० ते १२०, पेरु - ५० ते ८०, खजूर -१५० ते २००, पपई- ६० ते १००, मोर आवळा -१२० ते २००, सीताफळ - १५० ते २००, कलिंगड - ५० ते ६०, टरबूज -४० ते ६०, केळी - ५० ते ६० डझन, देशी केळी - १०० ते १२० डझन, किवी - १६०, ड्रॅगन- १५० ते २००, चिंच- १०० ते १४०, अननस -४० ते ५०.

खाद्यतेल : सरकी - १४५ ते १५०, शेंगतेल - १९२ ते १९८, सोयाबीन - १४० ते १४५, पामतेल - १४० ते १४५, सूर्यफूल - १४० ते १४५.

कडधान्य : हायब्रीड ज्वारी- २८ ते ३५, बार्शी शाळू- ३० ते ५०, गहू - ३४ ते ४४, हरभराडाळ - ९३ ते ९६ , तुरडाळ- १५० ते १६०, मुगडाळ -१०७ ते १३३, मसूरडाळ - ७७ ते ७८, उडीदडाळ - १२२ ते १३०, हरभरा- ८४ ते ८७, मूग-९२ ते १००, मटकी- ९५ ते १००, मसुर- ७० ते ७२, फुटाणाडाळ - ११० ते ११५, चवळी- ९५ ते १२५, हिरवा वाटाणा- १७५, छोला -१२० ते १५०.

अंड्याचे दर वाढू लागले

थंडीची चाहूल लागताच दसऱ्यानंतर अंड्याचे भाव वाढू लागले आहेत. शेकडा दरात ६० ते ६५ रुपयांची वाढ झाली आहे. ट्रेचा भावही वाढल्याने दर १७५ ते १८० रुपयांपर्यंत आहे. किरकोळ अंड्याचा दर किमान सहा रुपयांपुढे आहे. दिवाळी काळात दर स्थिर राहतील. मात्र, त्यानंतर पुन्हा दर वाढण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

RBI Report : देशातील महागाई दर कमी होणार; रब्बी उत्पादन वाढीचा आरबीआयचा अंदाज 

Soybean Market : सोयाबीनच्या हमीभावाला बारदान्याची अडचण

Pandharpur Wari Management : वारी कालावधीत वारकऱ्यांच्या सुविधांबाबत योग्य नियोजन करावे

Crop Damage : मॉन्सूनोत्तर पावसाने पिकांचे अंदाजे २ कोटींचे नुकसान

Rural Development Department : यशवंत पंचायतराज समितीकडून सोलापूर जिल्हा परिषदेची तपासणी

SCROLL FOR NEXT