PFME Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

PFME Scheme In Nagpur : ‘पीएफएमई’च्या अंमलबजावणीत नागपूर विभाग ठरला अव्वल

बॅंकांच्या असहकार्यामुळे पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या (पीएफएमई)अंमलबजावणीत अमरावती विभागाची पिछेहाट झाली असतानाच नागपूर विभागाने मात्र याच योजनेच्या अंमलबजावणीत दमदार कामगिरी केली आहे.

Team Agrowon

Nagpur News : बॅंकांच्या असहकार्यामुळे पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या (Prime Minister's Micro Food Processing Industries Scheme) (पीएफएमई)अंमलबजावणीत अमरावती विभागाची पिछेहाट झाली असतानाच नागपूर विभागाने मात्र याच योजनेच्या अंमलबजावणीत दमदार कामगिरी केली आहे.

नागपूर विभागात योजनेच्या तब्बल ११०० प्रस्तावांना मजुरी मिळाली असून, ७१० प्रकरणे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. या कामगिरीची दखल घेत कृषी आयुक्‍तांनी विभागाचे सहसंचालक राजेंद्र साबळे यांचा खास गौरवही केला.

शेतमालाशी संबंधित अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन मिळावे याकरिता अनुदान योजना राबविली जात आहे. बॅंकांनी कर्ज प्रकरण मंजूर केल्यानंतर संबंधितांनी उद्योगाची उभारणी करावी, त्यानंतर योजनेतील अनुदान कर्जदार लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची तरतूद आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीकरता नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांसाठी २०२०-२१ आणि २०२२-२३ या वर्षाकरिता १९६६ प्रस्तावांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यामध्ये २०२२ः२३ या वर्षातील ९६७ प्रस्तावाचा समावेश होता.

त्यानुसार नागपूर जिल्हा २१०, वर्धा १३६, चंद्रपूर २१८, भंडारा १३९, गोंदिया १४१, गडचिरोली १२३ याप्रमाणे उद्दिष्ट निश्‍चीत करण्यात आले होते.

यातील नागपूर जिल्हयात २१२, वर्धा १७२, चंद्रपूर २२८, भंडारा १२२, गोंदिया १४६, गडचिरोली १२० याप्रमाणे ११०० प्रस्ताव मंजुरीचे उद्दिष्ट विभागाने गाठले आहे.

सध्या बॅंकांकडे ७१० प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. योजनेच्या अंमलबजावणीत नागपूर विभागाने राज्यात आघाडी घेतली आहे तर देशात सर्वाधीक प्रस्तावांना मान्यता मिळत महाराष्ट्र राज्य देखील सर्वात पुढे आहे.

नागपूर विभागात बॅंकांकडे दाखल एकूण प्रस्तावांपैकी ८८५ प्रस्ताव नाकारल्या आहे. त्यामध्ये नागपूर जिल्हयात २४४, वर्धा १५३, चंद्रपूर ११२, भंडारा ८३, गोंदिया २३१, गडचिरोली ६३ याप्रमाणे प्रस्तावांचा जिल्हानिहाय्य समावेश आहे.

कृषी विभागातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातूनच या योजनेची प्रभावी अंमलबजावणी शक्‍य झाली. योजनेसाठी लाभार्थ्यांचा प्रतिसादही महत्त्वाचा असून, बॅंकांचे सहकार्य अपेक्षित आहे. त्यामुळेच राज्यात नागपूर विभागाने ११०० प्रस्तावाचा पल्ला गाठत आघाडी मिळविली आहे.
राजेंद्र साबळे, विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT