Agriculture Equipment Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Equipment Fraud: नागपूर कृषी अवजार घोटाळ्याची पुनर्चौकशी; PMOच्या आदेशानंतर कारवाईला वेग!

PMO Orders Inquiry: नागपूर जिल्ह्यातील कृषी अवजार घोटाळ्याची पुनर्चौकशी केली जाणार आहे. ८.७१ कोटींच्या या प्रकरणात महिला बचत गटांना साहित्यच न मिळाल्याचा आरोप आहे. खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या तक्रारीनंतर पंतप्रधान कार्यालयाने अहवाल मागवला आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News: नागपूर जिल्ह्यातील कृषी अ‌वजार घोटाळ्याच्या पुनर्चौकशीसाठी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दोन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे धूळखात होते. मात्र, खासदार श्यामकुमार बर्वे यांनी तक्रार केल्याने थेट पंतप्रधान कार्यालयाने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

समाज कल्याण विभागामार्फत २०२१-२२ मध्ये जिल्ह्यातील १०० महिला बचत गटांना कृषी अ‌वजार पुरविण्यात आले होते. खनिज प्रतिष्ठानमधून यासाठी ८ कोटी ७१ लाखांचा निधी मंजूर झाला होता. प्रत्येक महिला बचत गटाला ८ लाख ७१ हजारांचे साहित्य ९० टक्के अनुदानावर देण्यात येणार होते.

परंतु उमरेड तालुक्यातील महिला बचत गटांना साहित्यच मिळाले नाही. १० टक्के रक्कम भरल्यावर अनुदानाची रक्कम लाभार्थी बचत गटाच्या खात्यात टाकण्यात आली. समाज कल्याणकडून झालेल्या प्राथमिक चौकशीत अनुदानाची रक्कम लाभार्थी बचत गटाच्या खात्यात आल्यानंतर ती लगेच काढण्यात आल्याची माहिती समोर आली.

पुरवठादाराकडून काही साहित्य बचत गटांना देण्यात आले. परंतु ते नादुरुस्त असल्याचे कारण पुढे करीत परत नेले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खनिकर्म विभागाकडून संबंधित अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला. परंतु त्यांच्याकडून कुठलीच कारवाई झाली नव्हती.

या विषयासंदर्भात रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी तक्रार केल्याने थेट पीएमओ कार्यालयाकडन चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. त्याचप्रमाणे आमदार विकास ठाकरे यांनीही विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळेच आता या प्रकरणाची नव्याने सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दोन सदस्यीय समिती स्थापन केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT