PM Kisan Scam: नाशिकमध्ये पीएम किसान घोटाळा? बोगस १८१ बांगलादेशी लाभार्थी उघड

Fake Beneficiaries: नाशिकमधील भादवण गावात ‘पीएम किसान’ योजनेच्या लाभार्थी यादीत १८१ संशयित बांगलादेशी नोंदवले गेल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. यामुळे मोठा वाद निर्माण झाला असून, चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
PM Kisan Scam
PM Kisan ScamAgrowon
Published on
Updated on

Nashik News: शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा (पीएम किसान) लाभ दिला जातो. मात्र या योजनेमध्ये नाशिक जिल्ह्यातील भादवण (ता. कळवण) येथील पात्र लाभार्थ्यांच्या यादीत १८१ बोगस बांगलादेशी असल्याचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे म्हणणे आहे. त्यांनी समाजमाध्यमांवर बोगस लाभार्थ्यांची नावे असलेली यादी सादर केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

PM Kisan Scam
PM-KISAN Scam Alert: पीएम किसान योजनेच्या बनावट लिंकचा सापळा: शेतकऱ्यांनी घ्यावी दक्षता!

भादवण गावात एकही मुस्लिम रहिवासी व खातेदार नाही. असे असताना पीएम किसान योजनेच्या पात्र लाभार्थी यादीत १८१ मुस्लिम व्यक्तींची नावे असल्याने हे प्रकरण चर्चेत आले आहे. मात्र ते नेमके कुठले आहेत? हे पैसे कुठल्या खात्यावर गेले? हे चौकशीअंती समोर येणार आहे.

भादवण गावात एकही मुस्लिम नसताना व ही नावे योजनेत बसविण्यात आल्याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी माजी खासदार सोमय्या यांना कळवले होते. त्यानंतर गेल्या आठ दिवसांत चौकशी केल्यानंतर या १८१ लोकांचा बँक तपशील तपासला असता, संबंधित पश्‍चिम बंगालमधील बांगलादेश सीमेवरील असल्याचे सोमय्या यांचे म्हणणे आहे.

PM Kisan Scam
Crop Insurance Scam: पीकविमा योजनेत मोठा गैरव्यवहार! कृषिमंत्र्यांची विधानसभेत कबुली

त्यामुळे नावे कशी नोंदवली? बँक खाते कसे उघडले? कोणते व्यवहार झाले? या बाबत चौकशी करण्याची मागणी पोलिस यंत्रणेकडे केली आहे. वेळ पडल्यास केंद्र सरकारची मदत घेऊ. येथील ग्रामस्थांमुळे हे प्रकरण समोर आले; इतर ठिकाणी काय याची माहिती घेऊ, असे सोमय्या म्हणाले.

कळवण पोलिसात तक्रार

गावात मुस्लिम रहिवासी नसताना या गावात मुस्लिम लाभार्थ्यांची नावे आल्याने हे बांगलादेशी असल्याचा संशय सोमय्या यांनी व्यक्त केला आहे. यावर शुक्रवारी (ता. ७) कळवण येथे दौरा करून उपविभागीय कृषी अधिकारी, पोलिस यांची भेट घेतली. कारवाई होण्यासाठी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. एकंदरीत संबंधित व्यक्तींची गावात शेतजमीन नसताना किंवा खातेदार नसताना पीएम किसान योजनेचे लाभार्थी कसे, असा सवाल उपस्थित होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com