Nagar DCC Bank  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Loan Recovery : नगर जिल्हा बँकेने दुष्काळामुळे शेतीकर्ज वसुली थांबवली

Drought Update : राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने महाराष्ट्र शासनाने दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यांसह १०२१ महसुली मंडलांमध्ये अनेक सवलती जाहीर केल्या.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने महाराष्ट्र शासनाने दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यांसह १०२१ महसुली मंडलांमध्ये अनेक सवलती जाहीर केल्या. त्यात शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती घेण्याचाही निर्णय घेतला.

त्यानुसार जिल्हा सहकारी बॅंकेने शेतीकर्ज वसुली थांबवली असल्याची माहिती जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी दिली. ज्यांना स्वतः वसुली द्यायची आहे, अशा कर्जदाराची मात्र बॅंक वसुली स्वीकारणार आहे.

कर्डिले यांनी सांगितले, की राज्यात व नगर जिल्ह्यात दुष्काळसदृश मंडले जाहीर केली आहेत. शासनाने काढलेल्या निर्णयानुसार जिल्हा बॅंकेच्या महत्त्वाच्या सभेत अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाच्या सभेत चर्चा होऊन नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज वसुलीस स्थगिती दिल्याचे जाहीर केले.

नगर जिल्ह्यात शेती निगडित ४६१४ कोटी रुपये कर्जवसुलीला पात्र आहे. त्यापैकी आतापर्यंत १२५ कोटी रकमेची वसुली झाली आहे. शासनाच्या आदेशीने कर्जवसुली थांबली आहे. दुष्काळी स्थितीत बॅंक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असल्याचे बॅंकेचे अध्यक्ष कर्डिले व उपाध्यक्ष माधवराव कानवडे यांनी सांगितले.

ज्या कर्जदार शेतकऱ्यांना स्वतःहून कर्जवसुली द्यावयाची असल्यास अशा कर्जदारांसाठी बँकेकडून वसुली स्वीकारली जाईल. विहित मुदतीत कर्ज भरणाऱ्या सभासदांना शासनाच्या शून्य टक्के व्याजदर सवलतीचा लाभ होईल तसेच पुढील पीककर्ज वितरणही होईल, असे या वेळी सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Politics: यापुढे चुकीला माफी नाही

Lumpy Disease Issue: लम्पीने अहिल्यानगरला १४, मोहोळमध्ये दोन पशुधन दगावले

Malin Village : पुनर्वसन झाले, मात्र गावचे गावपण हरपले

Banana Export Workshop: निर्यातक्षम केळीबाबत वसईत शनिवारी परिसंवाद

Manikrao Kokate Controversy: कृषिमंत्री कोकाटे यांना अभय मिळाल्याची चर्चा

SCROLL FOR NEXT