NAFED  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Procurement : 'नाफेड'अंतर्गत १५ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी

Agricultural Support : खुल्या बाजारपेठेत सोयाबीनला अल्प दर मिळत असल्याने शासनाच्या आधारभूत किंमतीने सुरू असलेल्या नाफेड खरेदी केंद्रावर सोयाबीन विकून कसाबसा उत्पादन खर्च काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ पाहायला मिळत आहे.

Team Agrowon

Wardha News : खुल्या बाजारपेठेत सोयाबीनला अल्प दर मिळत असल्याने शासनाच्या आधारभूत किंमतीने सुरू असलेल्या नाफेड खरेदी केंद्रावर सोयाबीन विकून कसाबसा उत्पादन खर्च काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ पाहायला मिळत आहे.

याशिवाय ज्यांना सावकार, बँकांचे कर्ज, कृषी केंद्राची उधारी, शेतमालकाचा शेतीचा मक्ता आदी व्यवहार सोयाबीनवर ठरले होते, ते शेतकरी मिळेल त्या भावात सोयाबीन विकून कधीचेच मोकळे झाले. उर्वरित शेतकऱ्यांनी उत्पादकता खर्चाच्या भरपाईसाठी नाफेडला सोयाबीन देण्यावर भर दिला आहे.

त्यानुसार सेलू तालुक्यातील एक हजार ७३१ नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी ८११ शेतकऱ्यांच्या १४ हजार ७९१ क्विंटल सोयाबीनची सोमवार (ता. १६) पर्यंत खरेदी करण्यात आल्याचे सिंदी खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

सेलू तालुक्यातील नाफेड करिता मध्यस्थ संस्था म्हणून नेहमीप्रमाणे यंदाही सिंदी खरेदी विक्री सहकारी संस्थेला जबाबदारी देण्यात आली आहे. तसेही कधीकाळी फेडरेशनच्या कापूस एकाधिकार खरेदी काळात वैभव संपन्न या सहकारी संस्थांचे आता केवळ संस्थेचे स्वस्त धान्य दुकान चालविण्यापुरते अस्तित्व राहिले आहे.

या संस्थेचे सेलू आणि सिंदी असे दोन नाफेड नोंदणी आणि खरेदी केंद्र आहे. यापैकी सेलू केंद्रावर एक हजार २०१ शेतकऱ्यांनी तर सिंदी केंद्रावर ५३० शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून संस्थेच्यावतीने सेलू केंद्रावरील ५६० तर सिंदी केंद्रावरील ३५५ शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी आणण्याचा संदेश पाठविण्यात आला.

सेलू केंद्रावर ५१४ तर सिंदी केंद्रावर २९७ शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन विक्रीस आणले असून सोमवारी (ता. १६) पर्यंत सेलू केंद्रावर सात हजार ९७४ क्विंटल तर सिंदी केंद्रावर सहा ८१७ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आल्याचे सिंदी खरेदी विक्री संस्थेचे संचालक राजू कोपरकर आणि नाफेड खरेदी प्रमुख रमेश नागमोते यांनी सांगितले.

तर शासनाने नोंदणीची मुदत वाढवून ३० डिसेंबर केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी ताबडतोब नोंदणी करून शासनाच्या आधारभूत केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे उपसभापती प्रा. अशोक कलोडे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर ओसरणार

Sugar Rate : श्रावणातील वाढत्या मागणीमुळे साखरेचे दर वाढण्याची शक्यता

Cooperative Institute Maharashtra : सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजेत

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

SCROLL FOR NEXT