Onion Market Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Sale : ‘नाफेड’कडून कांदा विक्रीसाठी दुसरी निविदा

Onion Market : केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत रब्बी -२०२४ मध्ये खरेदी केलेला कांदा बाजारात आणण्याची तयारी गेल्या १५ दिवसांपासून सुरू आहे.

Team Agrowon

Nashik News : केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत रब्बी -२०२४ मध्ये खरेदी केलेला कांदा बाजारात आणण्याची तयारी गेल्या १५ दिवसांपासून सुरू आहे. कांदा विक्रीसाठी हमी दलालांची नियुक्ती करण्यासाठी पहिली निविदा ३० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाली होती. तर बुधवारी (ता. ४) उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांत कांदा विक्रीसाठी दुसरी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

बफर स्टॉकमधील ५ लाख टनांपैकी सव्वा दोन लाखांवर रब्बी कांद्याची खरेदी ‘नाफेड’कडून करण्यात आली आहे. हा कांदा बाजारात आणण्याची घाई करण्यात येत असून त्याची प्रक्रिया सुरू आहे.

यापूर्वी मुंबई, बंगळुरू, भुवनेश्वर व पाटणा या शाखेच्या माध्यमातून निविदा काढण्यात आल्या होत्या. याआधी बिहार, ओरिसा व कर्नाटक तर आता ‘नाफेड’कडून देशांतर्गत दुसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेश, उत्तराखंड राज्यांत कांदा विक्रीसाठी निविदा काढण्यात आली आहे.

एकीकडे ‘नाफेड’ने ग्राहकाकडून बाजारातील स्पर्धात्मक दराने कांदा खरेदी केलेली नाही. त्यातच दरात चढउतार असताना ‘नाफेड’ने बफर स्टॉक कांदा बाजारात आणण्याच्या हालचाली सुरू केल्यामुळे बाजार अस्थिर झाल्याची स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Navratri Festival: शक्ती रुपेन संस्थितः

Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’विरोधात १३ जिल्ह्यांत एल्गार; कोल्हापुरातील बैठकीत निर्धार

State Cooperative Bank Anniversary: राज्य सहकारी बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त बालनाट्याचा उपक्रम

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वरच्या कारभाऱ्यांचा आज होणार फैसला; मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

Dimbhe Dam Water Leakage: डिंभे धरणातून होतेय पाण्याची गळ

SCROLL FOR NEXT