NAFED : ‘नाफेड’कडून कांदा बाजारात आणण्याची तयारी

Onion Market : केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत एकूण ५ लाख टनांपैकी सव्वादोन लाखांवर रब्बी कांद्याची खरेदी ‘नाफेड’कडून मागील महिन्यात आटोपली, असे असतानाच एकच महिन्यात हा कांदा बाजारात आणण्याची घाई सुरू झाली आहे.
Onion Market
Onion Market Agrowon
Published on
Updated on

Nashik News : केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत एकूण ५ लाख टनांपैकी सव्वादोन लाखांवर रब्बी कांद्याची खरेदी ‘नाफेड’कडून मागील महिन्यात आटोपली, असे असतानाच एकच महिन्यात हा कांदा बाजारात आणण्याची घाई सुरू झाली आहे. त्यासाठी मुंबई, बेंगळुरू, भुवनेश्वर व पटना या शाखेच्या माध्यमातून निविदा काढण्यात आल्या आहेत. एकीकडे दरात पुन्हा घसरण आहे, तर दुसरीकडे ग्राहकांची ओरड नाही. असे असताना या माध्यमातून अधिकाऱ्यांकडून कांदा खरेदीतील सावळागोंधळ झाकला जात असल्याची चर्चा सुरू आहे.

कांद्याचा बफरस्टॉक बाजारात आणण्यासाठी काही दिवसांपूर्वी हालचाली सुरू झाल्या. यासाठी झालेला ‘नाफेड’चे व्यवस्थापकीय संचालक रितेश चौहान यांचा नाशिक दौरा चर्चेत आला. त्यांनी हा दौरा गैरप्रकार झाकण्यासाठी केल्याची दबक्या आवाजात चर्चा होती. दरम्यान, व्यूहरचना आखल्यानुसार निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Onion Market
Onion Market: कांद्याचे भाव काहीसे सुधारले

चौहान हे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांच्या दौऱ्याबाबत गोपनीयता पाळण्यात आली. याबाबत व्यवस्थापन व प्रशासनाने उत्तरे देण्यात टाळाटाळ केली होती. तर, आता कांदा बाहेर आणण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने संशय व्यक्त केला जात आहे. मात्र केंद्राच्या ‘ग्राहक व्यवहार’ विभागाकडून अशा प्रकारच्या सूचना असल्याचे ‘नाफेड’ कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे. यापूर्वी कांदा गोणी व वाहतुकीच्या निविदा अंतिम होण्याच्या मार्गावर आहेत.

तर आता विविध ठिकाणी संबंधित कार्यालयाच्या शहरांमध्ये अडत्यांकडून निविदा मागविण्यात येत आहेत. मात्र त्यातही गोंधळ असून आर्थिक देवाणघेवाणीच्या मुद्द्यावर ही प्रक्रिया होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Onion Market
Onion Market : बफर स्टॉकमधील कांदा ‘नाफेड’ने बाजारात आणू नये

एकीकडे दुष्काळी परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादन घेतले. त्यानंतर साठवणूक काळात हवामान बदलांमुळे कांद्याची सड होऊन नुकसान झाले आहे. एकीकडे केंद्राच्या माध्यमातून झालेल्या खरेदीत नाफेडच्या केंद्रावरही स्पर्धात्मक दर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भेटलेला नाही. असे असताना काही खरेदी केंद्रांवर खरेदीचा साठाही आढळत नसल्याची माहि०ती केंद्राच्या पदकासमोर आल्याची चर्चा आहे. अशातच बफर साठ्यातील तूट भरून काढण्यासाठी उर्वरित खरेदी पूर्ण करण्यासाठी दर पाडण्याचा डाव असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

देशातील ग्राहकांना स्वस्तात कांदा उपलब्ध करून देण्यासाठी किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या नाफेडचा कांदा बाजारात आणून सरकारकडून दर वर्षीच शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडण्याचे काम केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे कोट्यवधी रुपयांचे नुकसान भरून निघण्यासाठी केंद्र सरकारने आता बाजारभाव स्थिरीकरण योजना तयार करावी आणि प्रती क्विंटल ४ हजार रुपयांपेक्षा कमी दरात कांदा विक्री झालेल्या शेतकऱ्यांना दरातील तफावत भरपाई रक्कम म्हणून द्यावी
भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना
गेल्या तीन महिन्यांत कांद्याची टिकवणक्षमता धोक्यात आली आहे. मात्र असे असले तरीही शेतकऱ्यांकडे सध्या कांदा उपलब्ध आहे. त्यामुळे कांद्याची तूट निर्माण झाल्यानंतरच नाफेडच्या माध्यमातून कांदा खुल्या बाजारात आणला जावा. सध्या मिळणारा दर हा कांद्याची होणारी सड व उपलब्धता याच्या तुलनेत जास्त नाही. त्यामुळे दर पाडण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाऊ नये.
पंडित वाघ, कांदा उत्पादक शेतकरी, बार्डे, ता.कळवण

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com