Electricity Bill Recovery Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Bill Recovery : वीजबील थकबाकीदारांविरुद्ध महावितरणची धडक वसुली मोहीम

MSEDCL Recovery Drive : अनेक महिन्यांपासून महावितरण कंपनीने सेलू तालुक्यात घरगुती ग्राहकांच्या विज मिटरची रिडींग न घेताच अवास्तव विज बिले दिली आहेत.

Team Agrowon

Hingoli News : अनेक महिन्यांपासून महावितरण कंपनीने सेलू तालुक्यात घरगुती ग्राहकांच्या विज मिटरची रिडींग न घेताच अवास्तव विज बिले दिली आहेत. आता या ग्राहकांकडे थकबाकीचा आकडा वाढला असून अशा थकबाकीदारांविरुद्ध महावितरणने धडक वसुली मोहिम सुरू केली आहे.

ग्रामीण भागातील घरगुती विज ग्राहकांना महावितरण कंपनीने वर्षभर थकलेली एकदम लाखांची विज बिले पाठवल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. यात बहुतांश जणांची तर मिटर रिडींगच घेतलेली नाही. कित्येक जणांचे तर मिटरच बंद आहेत.

ज्यांना ही बिले पाठविण्यात आली त्यांना दोन वर्षांपासून कसलीही बिले देण्यात आली नाहीत, रिडींगही घेतले नाही. नियमित वेळेनुसार बिले दिली असती तर ती भरणे शक्य होते; मात्र ही बिले आता एकदम दिल्याने थकीत बिलांचा आकडा फुगला आहे. पन्नास हजारांवरून लाखांवर बिलाची रक्कम गेली आहे.

त्यावर कळस म्हणून बिलाच्या मुळ रक्कमेवर व्याज लावण्याचा प्रकारही महावितरण कंपनीकडून केला जात असल्याने ग्राहकांतून संताप व्यक्त केला जात आहे. आधीच शेतकऱ्यांच्या कोणत्याही शेतमालास भाव नाही.

यामुळे जगणे अवघड होऊन बसले आहे. सध्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू असताना विज वितरण कंपनीने बिल वसुलीसाठी धडक मोहिम हाती घेत, भरता बिल का करू अंधार असा इशारा दिला आहे. महावितरणच्या या मनमानी कारभाराविरोधात ग्रामीण भागामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

तालुक्यात अनेक गावांमधील घरगुती ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी वाढली. त्यामुळे विजग्राहकांना विजपुरवठा करणे आर्थिक दृष्ट्या महावितरण कंपनीस व्यवहार्य ठरत नसल्याने थकबाकी न भरल्यास अशा गावांचा कोणत्याही वेळी विजपुरवठा खंडीत केला जाईल.
- राहुल कोटीतीर्ते, कनिष्ठ अभियंता, सेलू

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ajit Pawar & Anjali Krishna : अजित पवारांनी मुरूम उपशासाठी पोलिस उपअधीक्षकांना धमकावलं; शेतकरी नेत्यांचा आरोप

Fruit Farming : फलोत्पादनात अकोला घेतोय आघाडी

Agriculture Technology: अन्नप्रक्रियेतील आधुनिक तंत्रज्ञान ‘पल्स इलेक्ट्रिक फील्ड’

Farm Road : शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांना आता सीमांकनासह विशिष्ट क्रमांक

Fertilizer Overpricing : खतांची चढ्या दराने विक्री भोवली

SCROLL FOR NEXT