Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत सर्वदूर मृग बरसला

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत सोमवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत अपवाद वगळता मृगाचा पाऊस सर्वदूर दमदार बरसला. तीनही जिल्ह्यांतील ४९ मंडलांत अतिवृष्टी झाली. त्यामध्ये छत्रपती संभाजी नगरमधील ३७, जालन्यातील ८ व बीडमधील ४ मंडलांचा समावेश आहे. अलीकडच्या काही वर्षांत पहिल्यांदाच असा दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या वेळेत पेरणी व लागवडीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३७ मंडलांत पाऊस धो-धो बरसला. या ३७ पैकी १० मंडलांत १०० ते १५० मिमी दरम्यान पाऊस झाला. जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर, कन्नड, खुलताबाद, फुलंब्री या तालुक्यांत सरासरी ५५ ते ९१ मिमी दरम्यान पाऊस झाला. जालन्यातील ८ मंडलांत अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील जालना, बदनापूर, भोकरदन, जाफराबाद, परतुर, अंबड, घनसावंगी या तालुक्यांमध्ये सरासरी ३५ ते ५६ मिमी दरम्यान पाऊस झाला.

छत्रपती संभाजीनगर व जालना या दोन जिल्ह्यांच्या तुलनेत बीडमध्ये पावसाची हजेरी थोडी कमी मात्र सहा-सात मंडलांचा अपवाद वगळता सर्वदूर राहिली. जिल्ह्यातील आष्टी, गेवराई, शिरूर कासार, माजलगाव या तालुक्यांत सरासरी २२ ते ४६ मिमी दरम्यान पाऊस झाला. तर बीड तालुक्यात सरासरी १०.२ मिमी पावसाची नोंद झाली. अंबाजोगाई, केज, परळी धारूर, वडवणी, पाटोदा या तालुक्यांमध्ये सरासरी १ ते ९.३ मिमी दरम्यान पाऊस झाला. जिल्ह्यातील ६३ पैकी ५६ मंडलांत पावसाची हजेरी लागली. त्यातही चार मंडलांत अतिवृष्टी झाली.

बीड जिल्हा

अतिवृष्टी झालेली मंडले (पाऊस मिमी मध्ये)

दावलावडगाव ८३.२५

जातेगाव ७४.२५

धोंडराई ९४

कडा ७५.२५

बीड जिल्हा (मंडळनिहाय पाऊस मिमीमध्ये)

राजुरी नवगण २३.३, पेंडगाव २५.८, आष्टी ३३.५, टाकळसिंग ४४.५, धामणगाव २८.३, पिंपळा ४०.५, धानोरा १८, गेवराई ४५.५, मादळमोही २७.५, जातेगाव ३९. ८, पाचेगाव ४९.३, धोंडराई ६२, उमापूर ४८.८, चकलांबा ४८.८, सिरसदेवी ४४.५, रेवकी ५०.५, तलवाडा ४४.३, माजलगाव १४.५, गंगामसला १७.३, किट्टी आडगाव १६.८, तालखेडा ३७.८, नित्रुड २४, सीरसाळा २६, शिरूर कासार ३२.५, रायमोहा २६.५, तिंतरवणी ४७.८.

छत्रपती संभाजीनगर

अतिवृष्टी झालेली मंडले (पाऊस मिमी)

छत्रपती संभाजीनगर ६५.५०

उस्मानपुरा ६९.८

कांचनवाडी ८०.३

चिखलठाणा १०३

चित्ते पिंपळगाव १५०.५

करमाड १३८.३

लाडसावंगी ८४.३

हरसूल ८०.५

कचनेर १२६.८

पंढरपूर ६६.३

पिसादेवी ७३.८

शेकटा ९०.५

वरुडकाजी ८०.५

अडुळ १०४.३

पिंपळवाडी ९७.८

लोहगाव १४१.३

ढोरकिन १०४

बिडकीन १४१.५,

पैठण ७१

आपेगाव ६५.३

नीलजगाव १४१.५

मांजरी ६५.८

शेंदूरवादा ८४.८

तुर्काबाद ७२.३

वाळूज ७२.३

जामगाव १००.३

नागमठाण ७९.८

लाडगाव ६८

घायगाव ७५.३

कन्नड ६८

चापानेर ६८

पिशोर ६७.८

करंजखेडा ७७

वेरूळ ६७.३

बाजार सावंगी ६७.३

पीरबावडा ८१.८

वडोद बाजार ७५.५

छत्रपती संभाजीनगर (मंडळनिहाय पाऊस मिमीमध्ये)

भावसिंगपुरा ६२.३, चौका ४८.५, बालानगर ६३.५, नांदर ५७.८, पाचोड ४४, विहामांडवा ६४.५, गंगापूर ४९.५, भेंडाळा ४८.५, हरसूल ३१.३, डोणगाव ५१.५, सिद्धनाथ वडगाव ३१.८, आसेगाव ३९.३, गाजगाव १९.३, वैजापूर ३४.३, खंडाळा २९.८, शिवूर २६.८, बोरसर २९.८, लोणी खुर्द २४.३, गारज २९.८, लासुरगाव ३१.८, महालगाव ५८.५, देवगाव रंगारी ३०, चिकलठाणा ३७, नाचनवेल ६३.५, चिंचोली लिंबाजी ५१, सुलतानपूर ४४.८, सिल्लोड ४५.८, निल्लोड ३९.३, भराडी २९.५, गोळेगाव २६, आमठाना ४७.३, बोरगाव ४७.३, पालोद २५.८, शिवना २१, सोयगाव २३.५, बनोटी ३६.३, जरंडी २७.३, फुलंब्री ६०.३, आळंद ४०.३, बाबरा ५५.८.

जालना जिल्हा

अतिवृष्टी झालेली मंडले

हसनाबाद ६७

राजूर ७१.८

केदारखेडा १०५.८

जाफराबाद ६७.३

परतुर १००.८

बदनापूर ७५

गोंदी ६६

अंबड ७९.५०

जालना जिल्हा (मंडलनिहाय पाऊस मिमीमध्ये)

भोकरदन ३६.३, सिपोरा ५९.८, अनवा ३०.३, पिंपळगाव रेणुकाई २५.५, माहोरा ५९.८, कुंभारझरी ५२.३, टेंभुर्णी ५२.५, वरुड बुद्रुक ४९.५, जालना शहर २४.८, जालना ग्रामीण ३४.८, वाघरुळ २६.८, विरेगाव २६, पाचनवडगाव २२.५, अंबड १९.५, धनगर पिंपरी ५९, जामखेड ५३, रोहिलागड ३८.८, वडीगोद्री ५०.३, सुखापुरी ५५, वाटुर ५०, श्रीष्टी ४२.३, शेळगाव ३७, दाभाडी ४०, ५२, पांगरी ४७.३, रोशनगाव २०.५, घनसावंगी ५४.८, राणी उचेगाव ३४.३, तीर्थपुरी ३२.८, कुंभार पिंपळगाव ३५.८, अंतर्वली टेंभी ३२.८, रांजणी ३९. ८, तळणी ४१.५, ढोकसाळ ३१.३, पांगरी गोसावी २६.५.

तालुकानिहाय सरासरी पाऊस (मिमीमध्ये)

जालना जिल्हा

जालना २२.८०

बदनापूर ४४

भोकरदन ५२

जाफराबाद ५६.२०

परतूर ४२.९०

मंठा २८

अंबड ५४.३०

घनसावंगी ३५.४०

छत्रपती संभाजीनगर जिल्हा

छत्रपती संभाजीनगर ८८.१

पैठण ९१.४

गंगापूर ५५.६

वैजापूर ४४.४

कन्नड ५२.७

खुलताबाद ५९.८

सिल्लोड ३१.७

सोयगाव २४.८

फुलंब्री ६२.७

बीड जिल्हा

आष्टी ३७.५

गेवराई ४६.१

शिरूर कासार ३५.६

माजलगाव २२.१

बीड १०.२

पाटोदा ७.२

अंबाजोगाई १.०

केज २.५

परळी ७.०

धारूर ९.३

वडवणी ३.८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT