Nilesh Lanke Agrowon
ॲग्रो विशेष

Nilesh Lanke : 'भीक नको, हक्काचं द्या'; लंके यांचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच

Price of Milk and Onion : दूध आणि कांद्याला दर मिळावा यासाठी खासदार निलेश लंके शुक्रवारपासून आंदोलन करत आहेत. लंके यांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून प्रशासनाने याची अद्याप दखल घेतलेली नाही.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यातील दूध उत्पादकांसह कांदा उत्पादक शेतकरी पडणाऱ्या दरामुळे संकटात सापडला आहे. तर दुधाला ४० रूपये दर देण्याची मागणी राज्यातील शेतकरी आणि विविध संघटना करत आहेत. याच मागणीवरून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार निलेश लंके अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश आंदोलनाचा शनिवारचा (ता.६) दुसरा दिवस आहे. मात्र या आंदोलनाची अद्याप प्रशासनाने दखल घेतलेली नाही. तर आज आयोजित असणारी जिल्हा नियोजनची बैठक ऑनलाईन होणार असल्याने लंके यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर 'दुधाला आणि कांद्याला योग्य भाव द्या. आम्हाला भीक नको, आमच्या हक्काचं द्या' असं ठणकावून लंके यांनी सरकारला सांगितलं आहे.

दुधाला आणि कांद्याला योग्य भाव मिळावा, या मागणीसाठी लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपला ठिय्या मांडला आहे. मात्र त्यांच्या जनआक्रोश आंदोलनाकडे प्रशासनाने कानाडोळा केल्याचे समोर येत आहे.

शनिवारी लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ५०० ते १००० गायी आणि शेळ्या घेऊन येऊ, असा इशारा दिला. तसेच जोपर्यंत सरकारला जाग येत नाही तोपर्यंत लढा देऊ, असे लंके यांनी म्हटले आहे. तर वेळप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांसाठी झोपड्या टाकू, असाही इशारा लंके यांनी सरकारला दिला. यावेळी जनावरे आंदोलनास्थळी नेण्यास पोलिसांनी मज्जाव केला. मात्र लंके यांनी स्वत: जनावरे आंदोलनास्थळी नेली. त्यामुळे काही काळ येथे तणाव निर्माण झाला होता.

दरम्यान लंके यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रशासनाच्या दुर्लक्षावरून टीका केली आहे. तर प्रशासनावर दबाव असल्याचा आरोप देखील लंके यांनी केला आहे. तर शुक्रवारी निवेदनावरून प्रशासनास लंके यांनी इशारा दिला होता. लंके यांनी, प्रशासनाने निवेदन स्वीकारण्यासाठी कार्यालयाखाली यावे, अन्यथा कार्यालयाचे गेट तोडून आत जाऊ, असा इशारा दिला होता.

लंकेंची नाराजी

दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित जिल्हा नियोजनची बैठक देखील ऑनलाईन घेण्यात येणार आहे. ही बैठक पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदारांची उपस्थिती असते. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न नेत्यांसह मंत्र्यांपर्यंत सहज पोहचणार होते. मात्र आता बैठकच नलाईन घेण्यात येणार आहे. त्यामुळे आंदोलनाचा धसका जिल्ह्यातील नेत्यांनी घेतल्याचे बोलले जात आहे. तर बैठकीचे ऑनलाईन नियोजन केल्यावरून लंके यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दुधाच्या कॅनची हंडी, कांद्याच्या माळा

या ठिकाणी दुधाच्या कॅनची हंडी उभारण्यात आली असून त्यास कांद्याच्या माळा लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे दुधाच्या कॅनची हंडी आणि कांद्याच्या माळा लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sowing Season: देशात मागील वर्षीच्या तुलनेत पेरणीला वेग; मॉन्सूनची शेतकऱ्यांना साथ

Banana Cluster : नांदेडमध्ये ‘केळी’साठी क्लस्टर मंजुरीच्या आशा पल्लवित

Flower Export : निर्यातक्षम फूल उत्पादकांचा हब होण्यासाठी मदत करणार

Crop Insurance Scheme : नांदेडला पीकविमा योजनेत सात लाख २३ हजार अर्ज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

SCROLL FOR NEXT