MP Nilesh Lanke  Agrowon
ॲग्रो विशेष

MP Nilesh Lanke : संरक्षण विभागाच्या परिसरातील बंद रस्ते खुले करण्याची गरज

Ahilyanagar Road Issue : अहिल्यानगर शहर आणि परिसरातील संरक्षण विभागाच्या हद्दीतून जाणारे अनेक रस्ते मागील अनेक वर्षांपासून नागरिकांसाठी खुले होते ते संरक्षण विभागाकडून बंद करण्यात आले आहेत.

Team Agrowon

Ahilyanagar News : अहिल्यानगर शहर आणि परिसरातील संरक्षण विभागाच्या हद्दीतून जाणारे अनेक रस्ते मागील अनेक वर्षांपासून नागरिकांसाठी खुले होते ते संरक्षण विभागाकडून बंद करण्यात आले आहेत. यामुळे लोकांची मोठी अडचण निर्माण झाली असून, हे रस्ते पुन्हा खुले करण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली.

खासदार लंके यांनी संरक्षणमंत्र्याकडे केलेल्या मागणीनुसार, अहिल्यानगर शहर आणि परिसरात संरक्षण विभागाची जागा आहे. या जागेतून तालुक्यातील काही गावांना जाणारे रस्ते आहे. यातील बहुतांश रस्ते संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंद केलेले असल्याने लोकांची मोठी गैरसोय होत असून दूरवरून जावे लागते.

अहिल्यानगर तालुक्यातील दरेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी बंद करण्यात आलेले रस्ते खुले करण्यासंदर्भात खासदार नीलेश लंके यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन खासदार लंके यांनी गुरुवारी (ता. ३) संसद अधिवेशनादरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन हे रस्ते खुले करण्याची मागणी केली.

न्यायालयाच्या नव्या इमारतीपासून भुईकोट किल्ल्याकडे जाणारा रस्ता, नटराज हॉटेलपासून सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूलकडे जाणारा रस्ता, दरेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील रस्ता व इतर अनेक रस्ते संरक्षण विभागाकडून बंद करण्यात आलेले आहेत. हे रस्ते बंद केल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे खासदार लंके यांनी मंत्री राजनाथ सिंह यांच्या निदर्शनास आणून दिले.

अहिल्यानगर परिसरातील वाकोडी, दरेवाडी, निंबोडी या गावांमध्ये संरक्षण विभागाच्या हद्दीजवळ असलेल्या ग्रामस्थांना स्वतःच्या जागेत बांधकाम करण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र संरक्षण विभागाकडून देण्यात येत नाही. या बाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी लंके यांनी केली. दिल्यानंतर या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Seed Law: स्वतंत्र बियाणे कायदा करणार: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Gold Market: गुंतवणुकीसाठी सोने खरेदीकडे कल

Transparency in Quality Control: ‘गुणनियंत्रणा’साठी ई-लॅब, ई-इन्स्पेक्टर

Maharashtra Heatwave: उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता

Sugarcane FRP: साखर कारखान्यांकडे ३,५०० कोटींची एफआरपी थकीत, राजू शेट्टींची माहिती, साखर आयुक्तांची घेतली भेट

SCROLL FOR NEXT