MP Nilesh Lanke : विधानसभेत पराभव झाला म्हणून राजकारण संपले नाही

Maharashtra Assembly Election Result : या निवडणुकीत यांत्रिकीकरणाने घात केला आहे. कोणी काही म्हणत असेल तर मी आमदार नाही तर आज जिल्ह्याचा खासदार आहे. प्रस्थापित व घराणेशाहीविरोधात माझा उदय झाला आहे.
Nilesh Lanke
Nilesh LankeAgrowon
Published on
Updated on

Ahilynagar News : या निवडणुकीत यांत्रिकीकरणाने घात केला आहे. कोणी काही म्हणत असेल तर मी आमदार नाही तर आज जिल्ह्याचा खासदार आहे. प्रस्थापित व घराणेशाहीविरोधात माझा उदय झाला आहे. त्यामुळे संघर्ष मला नवा नाही, असे खासदार नीलेश लंके म्हणाले.

विधानसभेत पराभव झाला म्हणून आपले राजकारण संपले नाही. महिनाभरात गुड न्यूज देणार, असे या वेळी लंके यांनी सांगितले. त्यांच्या वक्तव्याने राजकीय क्षेत्रात तर्कवितर्कांना उधाण आले. विधानसभा निवडणुकीत राणी लंके पराभूत झाल्यानंतर खासदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत सुपा (ता. पारनेर) येथे कार्यकर्त्यांचा चिंतन मेळावा झाला.

Nilesh Lanke
Election on Ballot Paper : बॅलेट पेपरवर निवडणूक घेणाऱ्या मार्कडवाडीला प्रशासनाचा दे धक्का!, जमावबंदीचा आदेश लागू

जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब हराळ, माधवराव लामखडे, माणिकराव भोसले, खंडू भुकन, बाबासाहेब तरटे, दीपक लंके, योगिराज गाडे, सुदाम पवार, अजय लामखडे, राजेंद्र चौधरी, शिवाजी व्यवहारे, नितीन अडसूळ, मारूती रेपाळे, डॉ. बाळासाहेब कावरे, ॲड. राहुल झावरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

या वेळी लंके यांनी विखे यांच्यावर थेट आरोप केले. लोकसभा निवडणुकीत पराभव केला म्हणून खुश व्हायचे कारण नाही. त्यांनी ‘ईव्हीएम’च्या माध्यमातून माझ्याविरोधात ट्रॅप लावला. निवडणुकीत यांत्रिकीकरणाने घात केला आहे. प्रस्थापित व घराणेशाहीविरोधात माझा उदय झाला आहे. त्यामुळे संघर्ष मला नवा नाही.

Nilesh Lanke
Election Expenditure : खर्च सादर न केल्यास सहा वर्षे निवडणूक बंदी

सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, असे सांगत समर्थकांचे कान टोचताना विधानसभा निवडणुकीत दक्ष राहिले असते तर आपल्या वाट्याला हा पराभव आला नसता. एकमेकांमधील जिरवाजिरवीचे राजकारण आता बंद करा.

आपण आपल्या कामाच्या जोरावर राज्यात ओळख निर्माण केली आहे. विधानसभेत पराभव झाला म्हणून आपले राजकारण संपलेले नाही. चुका दुरुस्त करा. समाजाला दोष द्यायचा नाही, असे लंके म्हणाले. महिनाभरात गुड न्यूज देतो एवढेच वक्तव्य केले. त्यामुळे राजकीय क्षेत्रात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com