Sangli Congress agrowon
ॲग्रो विशेष

Sangli Congress : शेतकऱ्यांची नाही अदानी, अंबानींची कर्जमाफी करणार सरकार : खासदार इम्रान प्रतापगढी

Imran Pratapgadhi : शेतकऱ्यांचे म्हणवणारे हे सरकार लबाड असून अदानी, अंबानी यांना कर्जमाफी देणारे सरकार हवे की, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारे सरकार हवे असेल तर मविआच्या साथ रहा असे खासदार इम्रान प्रतापगढी म्हणाले.

sandeep Shirguppe

Maharashtra Assembly Election : केंद्राने कृषी कायदे आणले, त्या वेळी सातशे शेतकरी शहीद झाल्यानंतर कायदे मागे घेतले. हे कुठल्या विचारांचे सरकार आहे, याची जाणीव होईल. 'बेटी बचाव' म्हणायचे अन् देशातील माताभगिनींवर अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घालायचे. शेतकऱ्यांचे म्हणवणारे हे सरकार लबाड असून अदानी, अंबानी यांना कर्जमाफी देणारे सरकार हवे की, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारे मविआचे सरकार हवे, याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे," असे आवाहन खासदार इम्रान प्रतापगाढी यांनी गुरूवारी (ता.१४) केले.

"केंद्रातल्या भाजपने खोटी आश्वासने देऊन महागाई कुठल्या कुठे नेऊन ठेवली आहे. काँग्रेस सरकारच्या काळातले दर व आत्ताचे दर याची तुलना करा," याकडे ही खासदार प्रतापगढी यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. जत येथील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार विक्रम सावंत यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत खासदार प्रतापगढी बोलत होते. यावेळी खासदार अमोल कोल्हे, विशाल पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

खासदार प्रतापगढी म्हणले की, "महाराष्ट्रावर कब्जा करून दिल्लीच्या रिमोटवर हे राज्य चालवण्याचे षड्यंत्र भाजप रचत आहे. गत तीन वर्षांत दिल्लीश्वरांनी राज्यात सत्तेचा काय खेळ केला, हे आपण अनुभवले आहे. ही निवडणूक केवळ एका मतदारसंघापुरती नाही, तर राज्याच्या भविष्याच्या निर्णयाची आहे. तेव्हा, जतमधून आमदार विक्रम सावंत यांना किमान ५१ हजार मतांच्या फरकांनी विजयी करा" असे प्रतापगढी म्हणाले.

"प्रचाराच्या निमित्ताने अखंड महाराष्ट्र पिंजून काढत आहे. सगळीकडे महाविकास आघाडीचे वारे आहे. त्यामुळे जतचा आमदार देखील सत्तेत सहभागी असणारा हवा. राज्यात बदल झाला की दोन पक्षांच्या टेकूवर उभे असणारे केंद्रातले सरकार बदलण्याच्या हालचाली सुरू होतील. त्यामुळे महाराष्ट्रात परिवर्तनाला साथ द्या," असे प्रतापगढी यांनी आवाहन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Meal Export Subsidy : सोया पेंड निर्यात अनुदानातून सोयाबीनला मिळेल का ‘बूस्ट’?

Sugarcane Crushing Season : राज्य सरकार नमले; गाळप हंगामाला मान्यता

Maharashtra Rain : मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

Pimpalgaon Joge Canal : पिंपळगाव जोगे धरणाच्या कालव्याची दुरवस्था

Sharad Pawar : राज्यात कोणी दाब दडपशाही करत असेल तर ते खपवून घेणार नाही : शरद पवार

SCROLL FOR NEXT