Cattle Census Maharashtra : विधानसभा निवडणुकीमुळे पशुगणनेला ब्रेक; अधिकारी अडकले निवडणूक प्रक्रियेत

Animal Department : राज्यात २० नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक होणार असल्याने निवडणूक प्रक्रियेसाठी बहुतांश कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे विभागाकडे प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध नसल्याने २१ वी पशुगणंना रेंगाळल्याचे चित्र आहे.
Cattle Census App
Cattle Census AppAgrowon
Published on
Updated on

Kolhapur Animal Department : राज्यात पशुगणनेला घरघर लागल्याचे चित्र दिसून येत आहे. लम्पीमुळे अनेक जनावरे दगावली आहेत तसेच त्यांचा अचूक डाटा संकलीत करण्यासाठी यंदाची २१ वी पशुगणना महत्वाची मानली जात होती. परंतु ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू होणाऱ्या या गणनेस सर्व्हर डाउनचे ग्रहण लागले. त्यानंतर राज्यात २० नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक होणार असल्याने निवडणूक प्रक्रियेसाठी बहुतांश कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे विभागाकडे प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध नसल्याने २१ वी पशुगणंना रेंगाळल्याचे चित्र आहे.

याबाबत पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. आर. बी.जंगम म्हणाले की, विधानसभा निवडणूक प्रक्रियेसाठी बहुतांश कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे विभागाकडे प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध नसल्याने पशुगणना निवडणुकीनंतर होणार आहे. तसेच यंदाची पशुगणना महत्वाची असल्याने आम्ही याकडे पूर्ण लक्ष देऊन काम करणार असल्याचे जंगम यांनी सांगितलं

पशुसंवर्धन विभागाकडून २१ व्या पशुगणनेची तयारी सुरू केली होती. परंतु, अॅपमध्ये तांत्रिक बिघाड व सर्व्हर डाउनमुळे ऑक्टोबरमध्ये होणारी पशुगणना नोव्हेंबरमध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि निवडणूक प्रक्रियेत अधिकारी, कर्मचाऱ्यांची व्यस्तता यामुळे ही पशुगणना कधी सुरू होणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

Cattle Census App
Vaccination Animals : परजिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या जनावरांचे लसीकरण सक्तीचे, पशुसंवर्धन विभागाचा निर्णय

पशुगणना दर पाच वर्षांनी केली जाते. शेवटची पशुगणना २०१९ मध्ये केली होती. पशुसंवर्धन विभागाकडून १ जूनपासून जनावरांना ‘ईअर टॅगिंग’ सक्ती केली आहे. त्यासोबत २०२२ मध्ये लम्पी साथीमुळे राज्यातील पशुधनाचे झालेले नुकसान यासाठी ही गणना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. पशुगणनेसाठी शहरी भागात चार हजार, तर ग्रामीण भागात तीन हजार कुटुंबांसाठी एक कर्मचारी असणार आहे.

औषधांची माहिती संकलित राहणार

एक जूनपासून जनावरांची ईअर टॅगिंग सक्ती केली आहे. ज्या जनावरांचे ईअर टॅगिंग केले आहे, केवळ तेच शासनाच्या योजना व उपचारासाठी पात्र ठरणार आहेत. टॅगिंगमुळे भारत पशुधन प्रणालीवर पशुधनाचे लसीकरण, प्रजनन, उपचार आणि खरेदी-विक्री यांच्या नोंदी राहणार आहेत.

या माहितीच्या आधारे पशूंवर करण्यात येणाऱ्या उपचारादरम्यान वापरलेल्या औषधांची माहिती संकलित होणार आहे. त्यामुळे संभाव्य साथीच्या रोगाच्या शक्यतेचा अंदाज तसेच रोगांच्या स्थितीबद्दल माहिती उपलब्ध होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com