Prajakt Tanpure Agrowon
ॲग्रो विशेष

Prajakt Tanpure : शेतकऱ्याच्या प्रश्नावर संसदेत ‘खासदार’ बोलले नाहीत : तनपुरे

Farmer Issue : सर्वसामान्यांच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेमध्ये खासदार बोलताना दिसले नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

Team Agrowon

Nagar News : साखर वाटावी की नाही, वाटावी का हत्तीवरून वाटावी हा ज्याचा त्याचा प्रश्न असून सर्वसामान्यांच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेमध्ये खासदार बोलताना दिसले नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. नगर जिल्हा सहकारी बँकेची नोकर भरती राज्य सरकार अथवा योग्य त्या एजन्सी मार्फत करावी अशी मागणी प्रसाद तनपुरे यांनी केली.

नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची पत्रकार परिषद झाली. माजी मंत्री आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, संदीप वर्षे, अशोक बाबर, किसनराव लोटके आदी उपस्थित होते. प्राजक्त ज्ञतनपुरे म्हणाले, की नगर जिल्ह्यात साखर वाटप करताना खासदार सुजय विखे यांनी साखर वाटप सुरू केली असे विचारल्यानंतर, आमदार तनपुरे यांनी कोणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तो त्यांचा वैयक्तिक भाग आहे

त्यामुळे आपण त्यावर बोलणे उचित नाही. पण हे करत असताना दुसरीकडे त्यांनी दुधाचे दर वाढवण्यासाठी अथवा कांद्याच्या विषयावर संसदेमध्ये बोलताना आपण कधी त्यांना पाहिले नाही व ऐकलेही नाही. नगर जिल्हा सहकारी बँकेमध्ये संगणक प्रणालीच्या अद्यावतीसाठी कमी प्रमाणामध्ये पैसा लागत असताना शंभर कोटी रुपयांचा खर्च करण्याचा घाट घातला गेला,

तर त्याकरता एक नवीन एजन्सी सुद्धा नेमली गेली. वास्तविक हा खर्च २५ ते ३० कोटी रुपयांत झाला असता मग एवढा खर्च कशाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसंच, अनेक विषयांच्या संदर्भामध्ये आता तेथील संचालकांनी आवाज उठवत अनेक गोष्टींना विरोध करण्यास सुरुवात केली असल्याचेही तनपुरे यांनी सांगितले.

श्री. तनपुरे म्हणाले, ‘‘नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवेल. त्यासाठी जिल्ह्यातच सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे परजिल्ह्यातील उमेदवार आयात करण्याची गरज भासणार नाही.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT