Amol Kolhe agrowon
ॲग्रो विशेष

Amol Kolhe : "शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे खोटे आश्वासन"; अमोल कोल्हेंची भाजपर टीका

Sangli Politics : आटपाडी तालुक्यात बलात्काराची घटना घडते आणि गुन्हेगाराला पाठीशी घातले जाते. अशा गुन्हेगारांच्या पाठीशी राहणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा,’’ असे आवाहन डॉ. कोल्हे यांनी केले.

sandeep Shirguppe

Sangli Assembly Election : सध्या महाराष्ट्रात दिवसाला आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. भाजप शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याचे खोटे आश्वासन देत आहे. तर राज्यात शेतकरी, मजूर, कामगार सर्वच स्तरातील लोक महागाईच्या झळा सोसत आहे. या सरकारला आपले खिसे भरण्याशिवाय कोणाचीही पडलेली नसल्याचा असा हल्लाबोल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे मंगळवारी (ता.१२) केला. महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार गटाचे सांगली जिल्ह्यातील विटा मतदारसंघाचे उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचार सभेमध्ये बोलत होते.

डॉ. कोल्हे म्हणाले की, ‘‘महाविकास आघाडीचे सरकार येणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्यासाठी वैभव पाटील यांना आमदार करा. आटपाडी तालुक्यात बलात्काराची घटना घडते आणि गुन्हेगाराला पाठीशी घातले जाते. अशा गुन्हेगारांच्या पाठीशी राहणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा,’’ असे आवाहन डॉ. कोल्हे यांनी केले.

डॉ. कोल्हे म्हणाले, "लाडक्या बहिणीला पंधराशे देता; मग लाडक्या जावयाला, भावाला रोजगार व शेतीमालाला भाव का देत नाही, हा प्रश्न लाडक्या बहिणींनी विचारायला हवा का? शरद पवार यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला होता. प्रतिवर्षी साडेबारा लाख तरुणांना रोजगार मिळेल. जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांहून अधिक वाढवण्याचा निर्णय, अशा पंचसूत्रीवर महाविकास आघाडीची सत्ता येणार कोल्हे म्हणाले.’’

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. बाबासाहेब मुळीक यांनी स्वागत केले. एकनाथ पवार, सुष्मिता जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे, शिवसेना उद्धव ठाकरे गट जिल्हाप्रमुख संजय विभूते, आमदार अरुण लाड यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी माजी आमदार ॲड सदाशिवराव पाटील, तासगाव तालुक्यातील सुरेश पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस हयुम सावनूरकर, रावसाहेब पाटील, संजय मोहिते, काँग्रेसचे नेते विठ्ठल साळुंखे, नितीनराजे शिंदे, हनुमंतराव देशमुख, राजूशेठ जानकर, किरण तारळेकर, सुखदेव पाटील, अविनाश चोथे, पद्मसिंह पाटील, पृथ्वीराज पाटील, मंगेश हजारे, जगन्नाथ पाटील, मनीषा शितोळे, प्रतिभा चोथे, अंबिका हजारे, ॲड. विजय जाधव, संजय तारळेकर उपस्थित होते.

‘आर. आर. पाटील यांची आठवण’

‘‘दोन जुलैला जी घटना घडली, ती अत्यंत धक्कादायक होती. आर. आर. आबा असते, तर त्यांच्या नियोजन व तोफांनी सरकारची पळता भुई थोडी केली असती. सांगली जिल्ह्यात आल्यावर आर. आर. आबांच्या कार्यकर्तृत्वाची विचारांची आठवण येणं स्वाभाविक आहे,’’ असे डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT