Jambhul Season
Jambhul Season Agrowon
ॲग्रो विशेष

Jambhul Farming : जांभूळ शेतीतून समृद्धीकडे वाटचाल

Team Agrowon

Palghar News : पालघर तालुक्यातील बहाडोली गाव जांभळांसाठी प्रसिद्ध आहे. वैतरणा नदी किनारची गाळाची माती आणि दमट वातावरण जांभळांच्या झाडांना पोषक ठरते.

जांभळाच्या झाडामागे ३० ते ४० हजारांचे उत्पन्न मिळत असल्याने पारंपरिक भात शेती सोडून शेतकरी जांभूळ लागवडीकडे वळत आहेत. जांभळांना भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी प्रयत्नशील आहेत.

बहाडोली आणि खामलोली गावात जांभळाची सहा हजार झाडे आहेत. नव्याने दोन हजार झाडांची लागवड करण्यात आली. कृषी विभागाच्या मार्गदर्शनात नवीन लागवड आणि जांभळाचे उत्पादन आणि फळाच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी मेहनत घेतली जात आहे.

बहाडोलीच्या जांभळांना मुंबई आणि लगतच्या बाजारपेठेत मोठी मागणी असते. डिसेंबर महिन्यात जांभळाच्या झाडाला मोहोर आल्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जांभळे काढणीसाठी तयार होतात. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दीड महिना जांभळांचा हंगाम सुरू राहतो.

शेतकरी पावसाळ्याच्या काळात येणाऱ्या फळांपासून रस निर्मिती आणि बियांपासून पावडर तयार करून विक्री करतात. मे महिन्यात जांभळाना मागणी मोठी असल्याने प्रतिकिलो हजार ते बाराशे रुपयांचा उच्चतम दर मिळू शकतो.

एक झाडापासून ४० हजारांपर्यंत उत्पन्न

बहाडोली गावाच्या परिसरात उच्च प्रतीच्या जांभळांचे उत्पादन देणारी सुमारे सहा हजार झाडे आहेत. जांभळाच्या एका झाडापासून हंगामात शेतकऱ्याला सुमारे ३० ते ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते.

जांभूळ विक्रीतून गावातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले आहे. कृषी विभागाने आता जांभळाच्या भौगोलिक मानांकनासाठी प्रयत्न करावेत.
अनिल पाटील, शेतकरी
नवीन लागवड केलेल्या झाडांची उंचीत होणारी वाढ रोखण्यासाठी छाटणी करून झाडाचा विस्तार जमिनीलगत झाल्यास फळे तोडणी सोपी होईल.
तरुण वैती, तालुका कृषी अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT