VNMKV Parbhani Agrowon
ॲग्रो विशेष

VNMKV Parbhani : ‘वनामकृवि’ आणि वेस्टर्न सिडनी विद्यापीठांत सामंजस्य करार

Agriculture Research : या करारावर कुलगुरू डॉ. इंद्र मणी व वेस्टर्न सिडनी विद्यापीठाच्‍या उपकुलगुरू प्रा. देबोराह स्वीने, हॉक्सबरी पर्यावरण व कृषी संस्थेच्या संचालक प्रा. इअन अँडरसन यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

माणिक रासवे

Parbhani News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व ऑस्ट्रेलियातील वेस्टर्न सिडनी विद्यापीठ यांच्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील कृषी संशोधन आणि शैक्षणिक कार्यासाठी नुकताच नवी दिल्ली येथे सामंजस्य करार करण्यात आला.

या करारावर कुलगुरू डॉ. इंद्र मणी व वेस्टर्न सिडनी विद्यापीठाच्‍या उपकुलगुरू प्रा. देबोराह स्वीने, हॉक्सबरी पर्यावरण व कृषी संस्थेच्या संचालक प्रा. इअन अँडरसन यांनी स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी वेस्टर्न सिडनी विद्यापीठाच्या इंटरनॅशनल स्ट्रॅटेजी आणि पार्टनरशिप विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. निशा राकेश, वरिष्ठ संशोधन कार्यक्रमाधिकारी डॉ. कोपाल चौबे आणि दक्षिण आशियाच्या विभागीय संचालक नम्रता आनंद हे उपस्थित होते.

या कराराबाबत डॉ. इंद्र मणी म्हणाले, की वेस्टर्न सिडनी विद्यापीठ हे एक आंतरराष्ट्रीय पातळीवरील अग्रगण्‍य विद्यापीठ असून, परभणी कृ‍षी विद्यापीठाच्‍या संशोधन आणि शैक्षणिक उपक्रमास लाभ होणार आहे. दोन्‍ही विद्यापीठाच्‍या वतीने संयुक्‍तपणे संशोधन प्रकल्‍प, शैक्षणिक कार्यक्रम राबविण्‍यात येणार असून, याचा कृषी शास्त्रज्ञांना आणि विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

या सामंजस्य कराराच्‍या माध्‍यमातून संयुक्त संशोधन प्रकल्प, शैक्षणिक कार्यक्रम राबविणे, विद्यार्थी आणि प्राध्‍यापक यांच्‍यात परस्पर भेटी, परिषदा, परिसंवादाच्‍या माध्‍यमातून विचारांची देवाण-घेवाण याचा लाभ शैक्षणिक दर्जा उंचावण्‍यास होणार आहे.

जागतिक दर्जाच्या ज्ञानप्रसाराला चालना देण्यासाठी संयुक्त प्रकाशने करणे आणि अभ्यासक्रम राबविणे, नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम तयार करणे, उच्च पदवी विद्यार्थ्यांसाठी दुहेरी पदवी कार्यक्रम आणि शैक्षणिक प्रकल्पांचा विकास साधने असे या सामंजस्य करारातून विकासात्मक बाबी साधता येणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paus Andaj: पाच जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज; पुढील ५ दिवस काही ठिकाणी ढगाळ हवामानासह तुरळक पावसाची शक्यता

Uddhav Thackeray: ...तर शेतकऱ्यांनी जूनपर्यंत कर्जाचे हप्ते भरायचे की नाहीत?; उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल

Spice Farming: मसाला पीक क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न करावेत

Forest Department : मंजूर आराखड्यांचा वन विभागाच्या नियोजनात समावेश करा

Rabi Crop Sowing : ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ३४ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी; अवकाळी पावसामुळे पेरणी रखडली

SCROLL FOR NEXT