PDKV VSI MoU Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Farming : ‘पंदेकृवि’, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये सामंजस्य करार

PDKV VSI MoU : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (पुणे) यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे.

Team Agrowon

Akola News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (पुणे) यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ऊस पिकासाठी अनुकूल हवामान, जमीन आणि सिंचनाची व्यवस्था आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्र वाढीसाठी वाव आहे. हे लक्षात घेता आता शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यातून विकास करण्यात येणार आहे.

या करारांतर्गत पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संशोधनपर प्रयोग, शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे उपलब्ध आधुनिक प्रयोग शाळेमध्ये कार्य करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यासह विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये तथा प्रक्षेत्रावर ऊस पिकावर संशोधन करण्यात येणार आहे.

ऊस पिकामधील प्रक्रिया आणि निर्यातक्षम उत्पादने तयार करण्यासाठी विविध कौशल्य आधारित अभ्यासक्रमाद्वारे उद्यमशीलता निर्माण करण्यासाठी प्रयत्नसुद्धा करण्यात येणार आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका कार्यक्रमात हा सामंजस्य करार करण्यात आला.

या वेळी विद्यापीठाचे कृषी अधिष्ठाता डॉ. एस. एस. माने, शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, पदव्युत्तर शिक्षण संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. ययाती तायडे, कृषीविद्या विभागाचे प्रमुख डॉ. आदिनाथ पसलावार, कुलगुरू यांचे तांत्रिक सचिव डॉ. नितीन कोष्टी,

एकात्मिक शेती पद्धती संशोधन केंद्राचे डॉ. जे. पी. देशमुख तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे मुख्य संशोधक डॉ. अशोक कडलग, नीलेश खरोटे आणि सुनील मुंडे उपस्थित होते. डॉ. नितीन कोंडे यांनी सूत्रसंचालन केले. जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Sowing: बुलडाणा जिल्ह्यात रब्बी पेरणी १०० टक्के

AI In Agriculture: पीक उत्पादकता वाढीसाठी पंजाबमध्ये 'एआय'चा वापर, काय आहे योजना?

Warehouse Receipt Use: वित्तपुरवठ्यासाठी वस्तूंचा तारण म्हणून वापर

District Science Exhibition: गणोरीत ५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप

Stepwell Conservation: बारवांचे पुनरुज्जीवन करणारा ‘रोहन’

SCROLL FOR NEXT