Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Water Project Stock : कोल्हापुरातील बहुतांश लघू प्रकल्‍प भरले

Team Agrowon

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने बहुतांश लघुप्रकल्प भरले आहेत. सोमवारी (ता. ८) दुपारपर्यंत शहरासह पूर्व भागात पावसाने काहीशी उघडीप दिली. पश्चिम भागासह धरणक्षेत्रात मात्र थांबूनथांबून पाऊस सुरूच होता.

सोमवारी दुपारी एक वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी राजाराम बंधाऱ्याजवळ ३३ फूट १ इंच होती. या ठिकाणी इशारा पातळी ३९ फूट आहे. विविध नद्यांवरील ५७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणांतून १३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

सोमवारी सकाळी नऊपर्यंत आजरा तालुक्यातील घाटकरवाडी, गवसे, राधानगरीतील झापाचिवाडी, खामकरवाडी, भुदरगडमधील वासनोली हे लघू पाटबंधारे प्रकल्‍प भरल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्‍या सूत्रांनी दिली.

नृसिंहवाडी येथे कृष्णा नदीचे पाणी दत्त मंदिराजवळ आले. मोहडे (ता. राधानगरी) येथे एका घराच्या पाठीमागील बाजूला असलेल्या डोंगराची दरड कोसळून मोठे दगड मागील दारातून थेट स्वयंपाकघरात घुसले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. आणखी कांही घरांवर दरडीची टांगती तलवार कायम आहे. तालुक्यात अन्य तीन ठिकाणी अशाच घटना घडल्या.

चंदगडला ताम्रपर्णी, घटप्रभा नदींचे पाणी पात्राबाहेर पडून शेतवडीत पसरले. काही ठिकाणी पुलांवर, बंधाऱ्यांवर पाणी आल्यामुळे त्या-त्या परिसरातील वाहतूक ठप्प झाली. चंदगड-हेरे मार्गावरील ताम्रपर्णी पूल पाण्याखाली गेल्याने प्रशासनाने पूल वाहतुकीसाठी बंद केला. शनिवारी रात्रभर संततधार लागल्याने सोमवारी पहाटेच सर्वत्र पूरस्थिती निदर्शनास आली.

नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडून शेतवडीत पसरले. नदीकाठची पिके पाण्याखाली गेली. येथील ताम्रपर्णी पुलावर रविवारी पहाटे पाणी आले. त्यातूनच वाहतूक सुरू होती. रविवारी दुपारनंतर पाण्याचे प्रमाण वाढले.

पुलाच्या दोन्ही बाजूने सुमारे दोनशे मीटर परिसरात पाणी पसरल्याने खबरदारी म्हणून प्रशासनाने बॅरीकेड्स लावून वाहतूक बंद केली. त्यामुळे तिलारीनगरला जोडणारी वाहतूक ठप्प झाली. घटप्रभावरील पिळणी, भोगोली, हिंडगाव हे बंधारे पाण्याखाली गेल्याने या गावांना जोडणारी वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT