Moringa Agrowon
ॲग्रो विशेष

Moringa Vegetable : शेवग्याच्या शेंगांची घरगुती बजेटला मदत

Shevga Farming Update : ग्रामीण भागात प्रत्येक घरासमोर एक ते दोन शेवग्याची झाडे लावलेली असतात. यातुन भाजीपाल्यावरील खर्च नियंत्रणात आणण्यासाठी मदत होते.

Team Agrowon

Vikramgad News : ग्रामीण भागात प्रत्येक घरासमोर एक ते दोन शेवग्याची झाडे लावलेली असतात. डिसेंबर-जानेवारीमध्ये या गावठी शेवग्याच्या झाडाला शेंगा लागतात. या शेंगांमुळे ग्रामीण भागातील गृहिणींची भाजीची चिंता मिटण्यास मदत होते. तसेच महिला या शेंगा विक्रीसाठी रस्त्याशेजारी बसलेल्या असतात.

डिसेंबर ते जानेवारी या थंडीच्या दिवसांमध्ये ग्रामीण भागात शेवग्याला मोठ्या प्रमाणात शेंगा लागतात. त्यामुळे या दोन महिन्यांत ग्रामीण भागात गृहिणींचे बजेट बसवण्यात या शेवग्याच्या शेंगांचा मोठा वाटा असतो. त्याचबरोबर या महिन्यात शेतावर असलेल्या किंवा अंगणात लावलेल्या वरव्याला (घेवडा) देखील शेंगा लागतात. त्यामुळे महिलांना बाजारातून भाजीपाला विकत आणण्याची वेळ सहसा येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांची मोठी बचत या दोन महिन्यांत होते.

हा भाजीपाला नैसर्गिक असतो. त्याच्यावर कोणत्याही प्रकारच्या रासायनिक औषधांची फवारणी केली जात नाही. त्याचबरोबर यासाठी कोणत्याही प्रकारची खते वापरली जात नसल्याने त्याचा कोणताही दुष्परिणाम भाजीपाला खाणाऱ्याच्या आरोग्यावर होत नाही.

पानांची, फुलांचीही भाजी

शेवग्याच्या शेंगा आरोग्यवर्धक आणि स्वादिष्ट असतात. त्याचबरोबर भाजी, कडधान्य, वरण, सुक्‍या आणि ओल्या मासळीच्या कालवणात टाकल्यास जेवणाची चव वाढते. यंदा मात्र त्यांची आवक कमी आहे. शेवग्याच्या शेंगा भाजीत किंवा आमटीत टाकण्याची पद्धत आहे. शेवग्याच्या पानांची, फुलांचीही भाजी करून खाल्ली जाते. अनेक आजारांत शेवगा औषधांसारखा गुणकारी आहे.

घराच्या बाजूला असलेल्या शेवग्याच्या शेंगांमुळे आम्हाला दोन महिने खूप कमी प्रमाणात भाजीपाला विकत आणावा लागतो. त्यामुळे या दोन महिन्यांत आमचा भाजीपाल्यावरील खर्च बऱ्याचपैकी वाचतो आणि या शेंगा चविष्ट असल्यामुळे त्याची भाजी खायलासुद्धा आवडते.
वैशाली सांबरे, गृहिणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT