Moringa Powder : शेवग्याच्या पानांची पावडर आरोग्यादायी का आहे?

शेवग्याच्या वाळलेल्या पानामध्ये ताज्या पानांपेक्षा अधिक पोषकतत्वे असतात आणि वापरण्यास अगदी सहज व सोपे जाते. शेवगा पानांच्या पावडरची कॅप्सुलदेखील बाजारात उपलब्ध आहे.
Moringa Powder
Moringa PowderAgrowon
Published on
Updated on

शेवग्याच्या वाळलेल्या पानामध्ये ताज्या पानांपेक्षा अधिक पोषकतत्वे असतात आणि वापरण्यास अगदी सहज व सोपे जाते. शेवगा पानांच्या (Moringa Leaves) पावडरची कॅप्सुलदेखील (Moringa Powder Capsule) बाजारात उपलब्ध आहे. बचतगटातील (SHG) महिलांना, शेवगा पावडरचा चांगला उद्योग करता येईल. शेवगा लागवडीसोबत पानांची देखील विक्री करता येते किंवा शेतातच एक प्रक्रिया युनिट सुरू करता येते.  शेवगा वनस्पतीचा प्रत्येक भाग हा शरीरासाठी खूप गुणकारी आहे. आहाराबरोबरच शेवग्याचा वापर पाणी शुद्धीकरणासाठी केला जातो. विदेशात शेवग्याच्या पानांपासून तयार केलेल्या भुकटीचा विविध प्रकारे वापर केला जातो. अशी भुकटीला भावही चांगला मिळतो. शेवग्यामध्ये कर्बोदके, प्रथिने, कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह, मॅग्नेशिअम, जीवनसत्त्व अ, सी व बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात आढळतात. शेवग्याच्या पानापासून पावडर कशई बनवायची आणि या पावडरचे आरोग्यासाठी फायदे काय आहेत याविषय़ी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.   

Moringa Powder
जनावरांची प्रथिनांची गरज भरून काढण्यासाठी हा पाला उपयुक्त | Moringa Plantation for Green Fodder

शेवग्याच्या पानाची पावडर तयार करण्याची घरगुती पद्धत 

- शेवग्याची ताजी पाने घेऊन चांगल्या प्रकारे धुवून सावलीत वाळवावीत. पाने सूर्यप्रकाशात वाळवल्यास त्यातील काही प्रमाणात पोषक तत्त्वांचा ऱ्हास होतो.  

- शेवग्याची पाने वाळवताना जाळीदार कापडाने झाकावीत. पाने पूर्णतः वाळण्यासाठी किमान तीन दिवस लागतात.   

- पाने पूर्णतः वाळल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक पावडर करावी. तयार पावडर  हवाबंद डब्यात साठवावी, 

Moringa Powder
निर्यातक्षम शेवगा उत्पादन तंत्र आणि निर्यातीच्या संधी

फायदे काय आहेत?

शेवग्याच्या पानांमध्ये कॅल्शियम व ॲंटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात आढळतात.   

१०० ग्रॅम भुकटीत दुधापेक्षा १७ पट अधिक कॅल्शियम व पालकापेक्षा २५ पट अधिक लोह असते. 

गाजरापेक्षा १० पट अधिक बीटा-कॅरोटीन असते. हे बीटा कॅरोटिन डोळे, त्वचा व रोगप्रतिकारतेसाठी फायद्याचे असते.   

शेवग्याच्या पानांमध्ये क्लोरजेनिक ॲसिड असून, ते नैसर्गिकरीत्या चरबी कमी करण्याचे काम करते.   

शरीरातील जमा होत राहणाऱ्या विषारी घटकाचे विरेचन करण्याचे काम शेवग्याच्या पानांची भुकटी करते. 

शेवगा हा ॲमिनो ॲसिडचा उत्तम स्रोत असून, त्यामुळे केरेटीन नावाचे प्रोटीन तयार होण्यास मदत होते. या प्रोटीनमुळे केस लांब व दाट होतात.   

या भुकटीत असलेल्या तंतूमय पदार्थांमुळे पचनक्षमता सुधारते, तसेच बद्धकोष्टता कमी होते. 

शेवग्यात ॲमिनो ॲसिड ट्रिप्तोफन असून, त्यामुळे मेलाटोनीन हे संप्रेरक तयार होण्यास मदत होते. या सर्व औषधी गुणांमुळे शेवगा ही आरोग्यदायी वनस्पती म्हणून ओळखली जाते.        

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com