Aadhaar E-KYC Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer E-KYC : सात हजारांवरील शेतकऱ्यांची ई-केवायसी करण्याकडे पाठ

E-KYC Update : ७७९१ शेतकऱ्यांनी अजूनही बँक खाते आधार संलग्न केले नाही. परिणामी हे शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Team Agrowon

Chandrapur News : केंद्र शासनाने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना आणि राज्य शासनाने नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी आणि बँक खाते आधार संलग्न करणे आवश्यक आहे. मात्र, सात हजार ४२४ शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नाही. ७७९१ शेतकऱ्यांनी अजूनही बँक खाते आधार संलग्न केले नाही. परिणामी हे शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केंद्र शासनाने २०१८ मध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली. देशातील सिमांत तसेच अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी लाभ देणारी सर्वात महत्त्वाची ही योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर वर्षी सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो. केंद्र शासनाच्या धरतीवरच राज्य शासनाने नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली.

या योजनेतूनही सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरणाच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात असल्याने त्यांना या पैशांचा वापरही करता येतो. ‘पीएम किसान’ या संकेतस्थळावर जाऊन लाभार्थ्यांना थेट अर्ज करता येतो. चंद्रपूर जिल्ह्यात २ लाख ४९ हजार ३८ शेतकरी आहे. पैकी २ लाख ३८ हजार १८३ शेतकरी या दोन्ही योजनेसाठी पात्र ठरले आहे.

या दोन्ही योजनेत नोंदणी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना जमिनीचा तपशील अद्ययावत करणे, बँक खाते आधार संलग्न करणे, ई-केवायसी प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी वारंवार शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून सांगण्यात आले. कृषी विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि बँक खाते आधार संलग्न केले. मात्र अजूनही सात हजार ४२४ शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नाही.

लाभापासून वंचित राहण्याची शक्यता

सात हजार ७९१ शेतकऱ्यांनी बँक खाते आधार संलग्न केले नाही. त्यामुळे हे शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा सोळावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. नमो शेतकरी सन्मान योजनेचा तिसरा हप्ता जमा करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT