Government Scheme : दोन लाखांवर शेतकऱ्यांनी केली ई-केवायसी नोंद

Agriculture Scheme : पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गंत शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये दिले जातात. त्याच्या जोडीला राज्य सरकार देखील अशा प्रकारची योजना राबविण्याच्या विचारात आहे.
Farmer E-KYC
Farmer E-KYCAgrowon
Published on
Updated on

Gondia News : शासनाच्या अनुदानात्मक योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यापार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील २ लाख १४ हजार ३६८ शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली असून तब्बल ४ हजार १७२ शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी आहे.

पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गंत शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये दिले जातात. त्याच्या जोडीला राज्य सरकार देखील अशा प्रकारची योजना राबविण्याच्या विचारात आहे. दोन्ही योजनेचे मिळून शेतकऱ्यांच्या खात्यात १२ हजार रुपये जमा होतील. मात्र योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी सक्‍तीची करण्यात आली आहे.

Farmer E-KYC
PM Kisan News : नमो सन्मानबरोबर पीएम किसानचाही हफ्ता शेतकऱ्यांना मिळणार का? पाहा अपडेट

या माध्यमातून आयकराचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना अपात्र ठरविता येते. योजनेत पारदर्शकता आणण्यासाठीच शासनाने शेतकऱ्यांना आधारकार्ड, सातबाराहसह लिंक करण्याकरीता ई-केवायसी प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. या प्रक्रियेला गती मिळावी याकरिता गावस्तरावर शिबिराचे आयोजनही करण्यावर भर देण्यात आला आहे.

Farmer E-KYC
PM Kisan Installment : पीएम किसान अंतर्गत ६ ऐवजी ८ हजार मिळणार? निवडणुकांच्या तोंडावर निर्णयाची शक्यता

आतापर्यंत ही प्रक्रिया राबविण्यासाठी तब्बल आठवेळा मुदतवाढ दिली गेली आहे. गोंदिया जिल्ह्यात ९८ टक्‍के शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. त्यामध्ये अर्जुनी मोरगाव तालुक्‍याची आघाडी असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यात एकूण खातेदार संख्या २,१८,५४० इतकी असून त्यापैकी २,१४,३६८ शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली आहे. मात्र त्यानंतरही ४१७२ शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.

ई-केवायसी करणारे

तालुकानिहाय शेतकरी

आमगाव २३३०९

अर्जुनी मोरगाव २६०३२

देवरी १८३२४

गोंदिया ४६५४३

गोरेगाव २४११५

सडक अर्जुनी २३५१२

सालेकसा १५९१०

तिरोडा ३६६३९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com