Property Dispute Agrowon
ॲग्रो विशेष

Shekhar Gaikwad : नैतिकदृष्ट्या चुकीचे, पण कायद्याने बरोबर

एका गावात गणेश नावाचा एक तरुण त्याच्या आई-वडिलांबरोबर राहात होता. गणेशला त्याच्या मेहनतीमुळे पदवीधर झाल्याबरोबर काही दिवसांनंतर हवाईदलात एका पदावर अधिकारी म्हणून नोकरी मिळाली.

शेखर गायकवाड

Shekhar Gaikwad

एका गावात गणेश नावाचा एक तरुण त्याच्या आई-वडिलांबरोबर राहात होता. गणेशला त्याच्या मेहनतीमुळे पदवीधर झाल्याबरोबर काही दिवसांनंतर हवाईदलात (Air Force) एका पदावर अधिकारी म्हणून नोकरी मिळाली. हवाईदलात रुजू झाल्यानंतर काही दिवसांतच त्याने त्याच्या एका हवाईदलातीलच मैत्रिणीसोबत प्रेमविवाह करण्याचे ठरविले.

गणेशच्या लग्नाला त्याचे आई-वडील व सर्व नातेवाईकसुद्धा आले होते. गणेशच्या आई-वडिलांना मात्र नवीन सुनेच्या घरच्या लोकांची कोणाचीच ओळख नव्हती. गणेशचा विवाह सोहळा अतिशय आनंदात पार पडला. काही दिवसांनंतर गणेश त्याच्या कामावर रुजू झाला. लग्नाच्या एक महिन्यानंतर गणेशचा आसाममध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये अचानक दुर्दैवी मृत्यू झाला.

गणेशच्या आई-वडिलांवर तर जणू आभाळ कोसळल्यासारखे झाले होते. गणेशची पत्नी केवळ एका महिन्यातच विधवा झाली होती.

तिच्यावर तर जणू कुऱ्हाडच कोसळली होती. गणेशच्या मृत्यूचे सगळे विधी पार पडल्यानंतर गणेशच्या आई-वडिलांनी सुनेला आणि तिच्या आई-वडिलांना सांगितले, की आमची सून आम्हाला मुलीसारखी आहे, आम्ही तिला वाऱ्यावर सोडणार नाही.

शिवाय तिचे पुन्हा लग्न लावून देण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ. पण सुनेचे आई-वडील गणेशच्या आई-वडिलांचे कोणतेही म्हणणे ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. ते तिला माहेरी घेऊन गेले. दु:खात असल्यामुळे कोणीच काही बोलले नाही.

काही दिवसांनी सुनेच्या आई-वडिलांनी तिला सांगितले, ‘‘हे बघ! तुझे हित कशात आहे ते आम्हाला जास्त कळते. गणेशच्या हवाईदलाची सर्व पेन्शन, इन्शुरन्सची सर्व रक्कम तर आपल्याला मिळालीच पाहिजे.

माहितीचा कायदा वापरून मी तुझा नवरा म्हणजे गणेशची काय काय प्रॉपर्टी होती ते शोधून काढतो. तू दुसरे लग्न न करता काही दिवस असेच काढ. तसेही तुझे लग्न होऊन एकच महिना झालाय.

शिवाय तुला मूल ना बाळ! सगळ्या प्रॉपर्टीमध्ये तुला हिस्सा मिळाल्यावर आपण दुसरा मुलगा शोधून तुझे लग्न करू.

गणेशच्या पत्नीने तिच्या आई-वडिलांनी सांगितल्याप्रमाणे तर केलेच, पण तिने कागदावर लग्न न करता, एका मुलाबरोबर अनधिकृतरीत्या राहून आयुष्यभर सासू-सासऱ्यांना छळत राहण्याचा सुद्धा कार्यक्रम केला.

सांगावयाचे तात्पर्य म्हणजे कलियुगाची लक्षणे आता प्रॉपर्टीच्या संबंधात पदोपदी आढळून येतात. कधी कधी नैतिकदृष्ट्या पूर्ण चूक, पण कायद्याप्रमाणे १०० टक्के बरोबर वागण्याचा माणसे प्रयत्न करताना दिसतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Rainfall : नांदेड जिल्ह्यात आजवर १८४ मिलिमीटर पावसाची तूट

South Solapur Water Crisis : उशाशी भीमा-सीना नद्या असूनही दक्षिण सोलापूर कोरडा ठणठण

Soybean Crop Damage: शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न करपले

Jalna Zilla Parishad Schools: पुढील दोन वर्षांत ५०० जिल्हा परिषद शाळांचा विकास करा : पालकमंत्री पंकजा मुंडे

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

SCROLL FOR NEXT