Shekhar Gaikwad : मध्यस्थ, मयत अन् मुख्यत्यारपत्र

Land Policy Guidelines : आठ दिवसानंतर जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या त्या दोन लोकांनी हरीशेठला जमिनीची कागदपत्रे दाखविली. ते दोघेही त्या जमिनीचे मालक नव्हते. मालकसदरी एका दुसऱ्या व्यक्तीचे नाव होते.
Land
Land Agrowon

Rural Story : एका शहरात हरीशेठ नावाचा एक व्यापारी राहत होता. हरीशेठ ने शहरालगत असलेल्या एका लहान गावात जमीन खरेदी करण्याचे ठरविले. हरीशेठ ने गावातील बऱ्याच लोकांना जमीन कशी पाहिजे व खरेदी करण्याबाबत विचारणा केली.

हरीशेठला गावात जमीन खरेदी - विक्री करणारे दोन मध्यस्थी करणाऱ्या व्यक्ती भेटल्या. त्या दोन मध्यस्थ व्यक्तींनी हरीशेठला गावामध्ये स्वस्तात चांगली जमीन मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

आठ दिवसानंतर जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या त्या दोन लोकांनी हरीशेठला जमिनीची कागदपत्रे दाखविली. ते दोघेही त्या जमिनीचे मालक नव्हते. मालकसदरी एका दुसऱ्या व्यक्तीचे नाव होते.

हरीशेठने जमिनीची कागदपत्रे पाहिल्यावर जमीन मालकासोबत जमीन खरेदी करण्याबाबत कधी चर्चा करायची असे त्या दोघांना विचारले. त्यावर त्या दोघांनी हरीशेठला असे सांगितले की, ‘‘आमच्याकडे जमीन मालकाचे मुखत्यारपत्र आहे.

त्यामुळे आम्हीच तुम्हाला खरेदीखत करुन देऊ. आम्हीच या जमिनीचे मालक आहोत आणि आम्हीच सह्या करणारे!’’ असे सांगून त्या दोन मध्यस्थांनी मुखत्यारपत्राची झेरॉक्स प्रत हरीशेठ ला दिली. तसेच व्यवहार करुन देण्याची खात्री पण दिली.

Land
Shekhar Gaikwad : अतिहुशारी अंगलट आली

हरीशेठने त्या जमिनीची खात्री करण्यासाठी ही कागदपत्रे गावातील अनेक लोकांना व एका वकिलाला दाखविली. त्यामध्ये त्याला ही जमीन खरेदी करण्यात कोणतीही अडचण नाही असे हरीशेठला सांगितले.

त्यानंतर हरीशेठने पाच-सहा दिवसानंतर सर्व पैसे देऊन जमिनीचे खरेदीखत करुन घेतले. खरेदी खताप्रमाणे ७/१२ वर जेव्हा नाव लावण्यासाठी तलाठी कार्यालयात फेरफार नोंद धरण्यात आली, तेव्हा तलाठ्याने सर्वांना नोटीस काढली.

त्यानंतर हरीशेठच्या एक बाब नव्यानेच लक्षात आली आणि ती म्हणजे, ज्या व्यक्तीचे मुखत्यारपत्र या दोन मध्यस्थ व्यक्तींनी दिले होते ती मूळ व्यक्ती सहा महिन्यांपूर्वीच मयत झाली होती. फेरफार नोंदीची नोटीस ‘व्यक्ती मयत’ असा शेरा पोष्टाकडून टाकून परत आली.

गावातील कुणालाही ती व्यक्ती मयत झाल्याची कल्पना नव्हती. फक्त त्या दोन मध्यस्थांना ती व्यक्ती मयत झाल्याची माहिती होती. त्या दोघांना हे सगळे माहीत असताना सुद्धा त्यांनी पैसे घेऊन व्यापारी हरीशेठ याची घोर फसवणूक केली होती.

Land
Shekhar Gaikwad : गरिबाला मदत द्यायची न्हाय का?

सांगायचे तात्पर्य म्हणजे मूळ मालक मयत झाला की, मयत व्यक्तीने करुन दिलेल्या मुखत्यारपत्राला कायद्यात काहीही अर्थ राहत नाही! बघता बघता हरीशेठ एका गुन्हेगारी प्रकरणात गुंतण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली.

शेखर गायकवाड, shekharsatbara@gmail.com

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com