Monsoon Update Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Update : बहुतांश महाराष्ट्रावर मॉन्सूनची छाया गडद

Monsoon News : तब्बल आठवडाभरापासून थांबलेली वाटचाल सुरू केल्यानंतर शुक्रवारी (ता.२१) बहुतांश महाराष्ट्रावर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) छाया पसरली आहे.

Team Agrowon

Monsoon Rain : पुणे : तब्बल आठवडाभरापासून थांबलेली वाटचाल सुरू केल्यानंतर शुक्रवारी (ता.२१) बहुतांश महाराष्ट्रावर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) छाया पसरली आहे. आता मॉन्सून सक्रिय होऊन जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. दोन दिवसांत संपूर्ण खानदेश आणि अमरावती जिल्ह्याच्या उर्वरित भागासह संपूर्ण महाराष्ट्रात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

यंदा केरळसह महाराष्ट्रात वेळेआधी पोहोचणाऱ्या मॉन्सूनने १२ जूनपर्यंत खानदेश व पूर्व विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात प्रगती केली होती. त्यानंतर मात्र मॉन्सूनची वाटचाल मंदावली होती. बंगालच्या उपसागरावरून प्रवाह क्षीण असतानाच, अरबी समुद्रावरून मॉन्सूनची वाटचाल थबकली आहे. यातच गुरुवारी (ता. २०) मॉन्सूनने पूर्व विदर्भात चाल करताना अमरावती, गोंदियापर्यंत मजल मारली. छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बिहारच्या काही भागांत मॉन्सूनने प्रगती केल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

शुक्रवारी (ता. २१) मॉन्सूनने आणखी चाल करत अमरावतीचा उत्तरेकडील भाग वगळता संपूर्ण विदर्भात मजल मारली. तर मध्य प्रदेश, झारखंडचा काही भाग, छत्तीसगड, ओडिशा, पश्‍चिम बंगालच्या आणखी काही भागात मॉन्सून धडकला आहे. दोन ते तीन दिवसांत उर्वरित महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशसह उत्तर भारताच्या आणखी काही भागांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

Gokrupa Amrut Production: जालना जिल्ह्यात २ लाख ५८ हजार लिटर ‘गोकृपा अमृत’ निर्मिती

American Armyworm: ३ उपायांनी करा मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण

Chilli Crop Management: मिरची पिकात वाढवर्धकांचा अनावश्यक वापर टाळा : डॉ. संजय पाटील

Sheep Grazing Permission: मेंढपाळांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, २१ वन विभागांमध्ये मेंढी चराईसाठी परवानगी

SCROLL FOR NEXT