Monsoon-Sowing Season Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon-Sowing Season : शेतकरी मृग नक्षत्राची चातकासारखी वाट का बघतात?

Agriculture Production : मृग नक्षत्रात पाऊस झाला नाही, तर शेती उत्पादनात घट होऊन शेतीवर परिणाम निश्चित होतो. कारण मृग नक्षत्रात पाऊस पडल्यास जमिनीत बियाणे वाफण्यासाठी (उगवण्यासाठी) पोषक ओलावा आणि धूप तयार होत असते.

डॉ. सोमिनाथ घोळवे

Indian Agriculture : वडील नेहमी सांगतात, "रोहिणी नक्षत्राने अंडी गाळली तर मृग नक्षत्र पाट झाडत असतो." अर्थात रोहिणी नक्षत्रात मॉन्सूनपूर्व पाऊस झाला तर मृग नक्षत्रात पाऊस कमी होतो. कारण मॉन्सूनचा पाऊस पाडण्यासाठी जे पोषक वातावरण हवे असते ते वातावरण रोहिणी नक्षत्रात पाऊस पडल्याने राहात नाही.

मृग नक्षत्रात पाऊस झाला नाही, तर शेती उत्पादनात घट होऊन शेतीवर परिणाम निश्चित होतो. कारण मृग नक्षत्रात पाऊस पडल्यास जमिनीत बियाणे वाफण्यासाठी (उगवण्यासाठी) पोषक ओलावा आणि धूप तयार होत असते.

त्यामुळे मृग नक्षत्रात पाऊस होऊन पेरणी केली, तर बियाणे वाफण्याचे प्रमाण हे जवळपास ९० टक्क्यांपेक्षा जास्त राहते. शिवाय रोगप्रतिकारकक्षमता देखील चांगली राहाते. मात्र मृग नक्षत्रानंतर पेरणी झाली, तर या सर्वांमध्ये घसरण होऊन जाते.

मृग नक्षत्राला कृषी संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. शेतकरी, शेतमजुरांच्या दृष्टीने हे नक्षत्र निर्णायक असते. मृग नक्षत्राचे दिवस पुढील पूर्ण खरीप हंगामावर परिणाम करणारे असतात.

मृग नक्षत्र ८ जून रोजी सुरू झाले असून २२ जून पर्यंत आहे. या नक्षत्रामध्ये पडलेला पाऊस शेतीसाठी आणि शेती उत्पादनासाठी अमृताप्रमाणे असतो. या नक्षत्रात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पदरात पीक शंभर टक्के पडण्याची शक्यता निर्माण होते.

त्यामुळेच शेतकरी मृग नक्षत्राची चातक पक्ष्यासारखी वाट बघत असतो. यंदा पावसाचं आगमन लांबलं आहे. त्यामुळे शेतकरी काळजीत पडला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT