Dam Water Level Agrowon
ॲग्रो विशेष

Dam Water Level : पावसाच्या हजेरीमुळे धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ

Dam In Maharashtra : राज्यात एकूण २ हजार ९९७ लहान, मध्यम आणि मोठ्या आकाराची धरणं आहे. मोठ्या धरणांमध्ये ३४.८६ टक्के पाणीसाठा आहे. तर मध्यम प्रकल्पात ४२.११ टक्के आणि लघु प्रकल्पात ३३.०२ टक्के पाणीसाठा आहे.

Dhananjay Sanap

Monsoon Rain : मॉन्सूनने संपूर्ण राज्य व्यापलं आहे. राज्यात मॉन्सूनच्या जोरदार सरी हजेरी लावत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, २० जून रोजी राज्यातील एकूण धरणांमधील पाणीसाठा ३५.५८ टक्क्यांवर पोहचला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत १९.८५ टक्के साठा होता.

राज्यात एकूण २ हजार ९९७ लहान, मध्यम आणि मोठ्या आकाराची धरणं आहे. मोठ्या धरणांमध्ये ३४.८६ टक्के पाणीसाठा आहे. तर मध्यम प्रकल्पात ४२.११ टक्के आणि लघु प्रकल्पात ३३.०२ टक्के पाणीसाठा आहे. यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेच्या तीव्र झळांनी जलशयातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट झाली. त्यामुळे मे महिन्यात पाणी टंचाईचं संकटं अधिक गंभीर झालं. मात्र, पूर्व मोसमी पावसाने काहीसा दिलासा मिळाला.

विभागनिहाय धरणांचा पाणीसाठा

नागपूर विभागातील लहान, मध्यम आणि मोठ्या आकाराच्या ३८३ धरणांमाध्ये ३१.७५ टक्क्यांवर, तर अमरावती विभागातील २६४ धरणांमध्ये पाणीसाठा ३९.०८ टक्क्यांवर पोहचला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातील ९२० धरणांमध्ये ३०.९९, नाशिक विभागातील ५३७ धरणांमध्ये ३५.७३ टक्के, पुणे विभागातील ७२० धरणांमध्ये ३६.२७ टक्के आणि कोकण विभागातील १७३ धरणांमध्ये ४२.६५ टक्क्यांवर पाणीसाठा पोहचला आहे.

यंदा मॉन्सूनपूर्व पाऊस मे महिन्यात धो-धो बरसला. मे महिन्यात विविध भागात उच्चांकी पावसाची नोंद झाली. तर जून महिन्यातही विविध भागात पाऊस हजेरी लावत आहे. तीन आठवडे एकाच जागेवर मुक्काम ठोकून असलेल्या मॉन्सूननेही वेगाने वाटचाल करत संपूर्ण राज्य व्यापलं आहे. राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे.

दरम्यान, हवामानशास्त्र विभागाने मॉन्सून हंगामात दमदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्यातील धरणं पूर्ण क्षमतेनं भरतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मॉन्सूनच्या सरीमुळे वाफसा स्थिती असलेल्या भागात पेरण्यांनी वेग घेतला आहे. परंतु काही जिल्ह्यात पेरणी योग्य वाफसा स्थिती नसल्यामुळे पेरण्या रखडलेल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Damage: गारपीट अवकाळीचा पिकांना तडाखा; विदर्भ, मराठवाड्यात पिकांचे नुकसान; बळीराजा संकटात

Panchayat Raj Abhiyan: पंचायतराज समृद्ध अभियानात सोलापुरातील २५० गावांचा सहभाग

Farmers Demands: ‘आधी गळती काढा, मगच पाणी सोडा’

Nira Canal Water Release: नीरा उजवा कालव्यातून उन्हाळी आवर्तनाला सुरुवात

Agrowon Podcast: सोयाबीनचा भाव टिकून; कापुस दरात सुधारणा, कैरीला उठाव, कलिंगडाला मागणी तर तुरीचे दर स्थिरावले

SCROLL FOR NEXT