Monsoon Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon : मॉन्सूनची आगेकूच वेगाने सुरू

Monsoon Update : मॉन्सूनने संपूर्ण अंदमान निकोबार बेट समूह व्यापून, पूर्व मध्य बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातून प्रगती करत श्रीलंकेच्या आणखी काही भागात हजेरी लावली आहे.

Team Agrowon

Pune News : नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शुक्रवारी (ता. २३) आगेकूच सुरूच ठेवली आहे. मॉन्सूनने संपूर्ण अंदमान निकोबार बेट समूह व्यापून, पूर्व मध्य बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातून प्रगती करत श्रीलंकेच्या आणखी काही भागात हजेरी लावली आहे. बंगालच्या उपसागरातून मॉन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे.

अंदमान-निकोबार बेटसमूह आणि मालदीवमध्ये रविवारी (ता. १९) मॉन्सूनचे आगमन झाले. अनेक ठिकाणी मुसळधार पावसासह मॉन्सून धडकला. बुधवारी (ता. २२) संपूर्ण निकोबार बेटे आणि उत्तर अंदमान बेटांवरील माया बंदरपर्यंतच्या भागात मॉन्सून पोहोचला आहे. तर अरबी समुद्रातून प्रगती करत मालदीवचा आणखी काही भाग, कोमोरिन समुद्राचा भाग आणि श्रीलंकेच्या निम्म्या भूभागात मॉन्सून दाखल झाला होता.

दरम्यान, शुक्रवारी (ता. २३) मॉन्सूनने आगेकूच सुरू ठेवली आहे. अंदमान बेट समूह, अंदमान समुद्र व्यापतानाच, अरबी समुद्रातून मॉन्सूनची वाटचाल केली आहे. मालदीव आणि कोमोरिन भागासह श्रीलंकेचा आणखी काही भाग मॉन्सूनच्या छायेखाली आला आहे. मॉन्सून ३१ तारखेपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. वेगाने सुरू असलेली वाटचाल पाहता मॉन्सूनच्या केरळातील आगमनाची उत्सुकता वाढली आहे.

उपसागरात घोंघावणार चक्रीवादळ

मध्य बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाब क्षेत्राची (डिप्रेशन) निर्मिती झाली आहे. ही प्रणाली बांगलादेशाच्या खेपूपारापासून ७३० किलोमीटर दक्षिणेकडे, पश्‍चिम बंगालच्या कॅनिंगपासून ७५० किलोमीटर दक्षिणेकडे होती. आज (ता. २५) सकाळपर्यंत उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. तर रविवारी (ता. २६) मध्यरात्रीपर्यंत बांगलादेशच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT