Indian Farmer Agrowon
ॲग्रो विशेष

Shetkari Karjmafi: माॅन्सून दारात, पेरणी कशी करायची? कर्जमाफीअभावी शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या

Farmer Crisis: महायुती सरकारने कर्जमाफीचे आश्वासन देऊन सत्ता काबीज केली. पण कर्जमाफीचा शब्द पाळला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी खरिपाच्या पेरणीपासूनच सुरु झाल्या आहेत.

Anil Jadhao 

Pune News: माॅन्सून अंदमानात आला. त्यामुळे पेरणीच्या तयारीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली. मशागती उरकल्या आहेत. आता खते, बियाण्याची खरेदी करावी लागेल. पण मागचेच कर्ज थकल्याने बॅंका नवे कर्ज देणार नाही. महायुती सरकारने कर्जमाफीचे आश्वासन देऊन सत्ता काबीज केली. पण कर्जमाफीचा शब्द पाळला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी खरिपाच्या पेरणीपासूनच सुरु झाल्या आहेत. 

माॅन्सून अंदमानात चाहूल लागल्यानंतर शेतकरी पेरणीपूर्व कमांना वेग देतात. पेरणीपूर्व मशागती करून शेतकरी पेरणीयोग्य पावसाची वाट पाहतात. पेरणीसाठी खते, बी-बियाणे आणि अवजारांची खरेदी करतात. त्यासाठी शेतकऱ्यांची पैशांची गरज बॅंकांकडून मिळणाऱ्या पीककर्जातून पूर्ण होते. दरवर्षी नवं-जूनं करून शेतकरी काम भागवतात. पण मागची दोन वर्षे आतबट्ट्याची ठरली. २०२३ मध्ये पाऊसच कमी पडला. शेतीत घातलं तेवढही मिळालं नाही. बाजारात भाव जास्त दिसला पण हात पीकच कमी आले होते. 

दोन वर्षे तोट्याचे

देशात २०२४ च्या हंगामात पाऊस चांगला झाला. पीकही चांगले आले. मात्र बाजारात भावच मिळाला नाही. सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा, मूग, उडीद या सर्व पिकांची विक्री हमीभावापेक्षा कमी भावात करावी लागली. आपल्या राज्याचे महत्वाचे पीक असलेल्या कापूस आणि सोयाबीनची विक्री तर हमीभावापेक्षा किमान ५०० ते १ हजार रुपयाने कमी भावात करावी लागली. कोणत्याच मालाला भाव मिळाला नाही. त्यामुळे उत्पादन चांगले येऊनही उत्पन्न मिळाले नाही. 

आहे तोच बोजा भरता येईना

शेतीचा एक हंगाम तोट्याचा गेला तर तो भरून येण्यासाठी किमान पुढचे ३ हंगाम चांगले जावे लागतात. पण सलग दोन हंगामात शेतकऱ्यांना तोटा झाला. त्यामुळे शेतकरी बॅंका भरू शकले नाहीत त्यामुळे कर्जे थकली. मार्च अखेरीस राज्यात २३ लाख शेतकऱ्यांकडे ३५ हजार कोटींचा बोजा थकीत होता. बॅंकांनी कर्जे भरण्यासाठी शेतकऱ्यांसाठी तगादा लावलाआहे. तोच बोजा शेतकरी भरू शकत नाहीत. त्यामुळे आता पुन्हा पेरण्या करायच्या पण त्यासाठी पैशांची गरज आहे. तर आता पेरणीसाठी पैसा आणायचा कुठून ? हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. 

कर्जमाफी हाच पर्याय

सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. आताही सत्तेतील मंत्री कर्जमाफी देऊ, असे सांगत आहेत. कर्जमाफी देणार नाही, असे कुणीही स्पष्ट बोलत नाही. पण कर्जमाफी कधी होणार ? याविषयी सरकार सांगत नाही. सरकारने आता कर्जमाफी केली तर किमान शेतकऱ्यांना खरिपाची तयारी वेळेत करता येईल. अन्यथा कर्जमाफी अभावी खरिपाच्या पेरण्यांवर परिणाम होऊ शकतो. शेतकऱ्यांना पुन्हा सावकारांच्या दारात जावे लागेल. यामुळे कर्जबाजारीपणा वाढून आत्महत्याही वाढतील, अशी भाती काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Uddhav Thackeray On Farmers: मोदींना विदेशाची पर्वा, शेतकऱ्यांचं काय? उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

Dam Water Discharge : भंडारदरा, निळवंडे धरणांतून विसर्ग सुरू

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा प्रकरणी सीएससी चालकांविरुद्ध गुन्हा

Soybean Seed Rejection : सोयाबीनचे ५३ हजारांवर क्विंटल बियाणे नापास

Maharashtra Farmer Issue: संत्रा बागांवरील फायटोप्थोरा नुकसानीबाबत मदतीची मागणी

SCROLL FOR NEXT