Monsoon Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Update : मॉन्सून अखेर महाराष्ट्रात दाखल, तळकोकणात बरसल्या सरी

monsoon 2024 update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मॉन्सूनची आतुरतेने वाट पाहली जात होती. ही प्रतिक्षा आता संपली असून मॉन्सून अखेर महाराष्ट्रात दाखल झाला. 

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्यांकडून यंदा मॉन्सूनची आतुरतेने वाट पाहली जात होती. अखेर मॉन्सूनची प्रतिक्षा संपुष्टात आली आहे. महाराष्ट्रात मॉन्सून गुरुवारी (ता.६) दाखल झाल्याचं पुणे हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी जाहीर केलं आहे. मॉन्सूनच्या सरी तळ कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये बरसल्या. त्यामुळे नागरिकांना प्रचंड आनंद झाला असून बुधवारी राज्यातील विविध ठिकाणी मॉन्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. 

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) गुरुवारपासून मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये वादळ आणि विजांचा कडकडाटात पाऊस होईल असा इशारा दिला होता. तसेच पावसाचा येलो अलर्ट देखील जारी केली होता. गुरूवारी सकाळपासून कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसह मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाच्या सरी बरसत आहेत. 

तर नैर्ऋत्य मोसमी पावसाचे महाराष्ट्रात आगमन झाल्याची माहिती हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी दिली आहे. होसाळीकर यांनी याबाबत ट्विट करत म्हटले की, नैर्ऋत्य मोसमी पावसाचे आज ६ जून रोजी महाराष्ट्रात आगमन झाले. कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेडक, भद्राचलम  विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत नैर्ऋत्य मोसमी पाऊस पोहचले. 

यंदा वेळेआधीच मॉन्सून दाखल झाला. २९ मे रोजी अंदमान आणि निकोबारच्या बेंटावर मॉन्सून धडकला. त्यानंतर कर्नाटक, तेलंगणा, किनारी आंध्र प्रदेशात मॉन्सूनची प्रगती झाली असून बंगालच्या उपसागरातील बहुतांशी भागात मॉन्सून पोहचला आहे. पुढील ३ ते ४ दिवसांमध्ये मॉन्सून महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांसह संपूर्ण कर्नाटक आणि आंध्र प्रदेश व्यापेल असाही अंदाज आहे.

हवामान विभागाचा अंदाज

राज्यात अखेर नैर्ऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. यादरम्यान राज्याच्या विविध भागात मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी लागली होती. त्यामुळे खरीपाच्या लागवडीच्या कामांना गती आली आहे. दरम्यान गुरूवारी आणि शुक्रवारी (ता.७) उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Godavari River Basin : गोदावरी खोरे मोठे, मात्र तुटीचे खोरे

Agriculture Irrigation Scheme: शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार ४ लाखांपर्यंत अनुदान; सिंचन क्षेत्र वाढीसाठी सरकारची योजना

Post-Harvest Packaging : किरकोळ ग्राहकांपर्यंत शेतीमाल पोहोचविण्यासाठी पॅकेजिंग

Orchard Farming : नवीन फळझाडांची रोपे, कलमांची निवड

Herbal Processing Business : कोकणात सुगंधी, वनौषधींपासून तेल, पावडर निर्मिती

SCROLL FOR NEXT