Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Desi Cow Conservation : देशी गो संवर्धनासाठी आधुनिकतेची जोड गरजेची

Team Agrowon

Pune News : सेंटर ऑफ एक्सलन्स या केंद्राच्या बळकटीकरणासाठी ७१ कोटींच्या भरीव निधीची तरतूद केली आहे. या निधीच्या आधारे या केंद्रामध्ये अत्यंत आधुनिक व जागतिक दर्जाची देशी गाईंची गोशाळा उभी करून तिथे संशोधन व आधुनिक पशुधन व्यवस्थापन तंत्रज्ञान विकसित करणे शक्य होईल. हा प्रकल्प म्हणजे परंपरेला दिलेली आधुनिकतेची जोड ठरेल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या सेंटर ऑफ एक्सलन्सचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागात बुधवारी (ता.९) झाले.

यानिमित्ताने नवीन अवजारे, शेड याचे भूमिपूजन व नूतनीकरण केलेला मुक्त संचार गोठा व नवीन पर्यावरण नियंत्रित गोठ्याचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी राज्याच्या गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद उपाध्यक्ष तुषार पवार,

कृषी परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, विद्यापीठाचे अभियंता मिलिंद ढोके, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने व या प्रकल्पाचे तांत्रिक प्रमुख डॉ. धीरज कंखरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पल्लवी सूर्यवंशी यांनी तर डॉ. धीरज कंखरे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Claim : विम्यासाठी योग्य नुकसानीच्या पूर्वसूचना कशा द्यायच्या? योग्य पर्याय कसे निवडायचे?

Samruddhi Train : शेतीमाल पार्सलसाठी शेतकऱ्यांची गर्दी

Soybean Procurement : सोयाबीनमधील ओलाव्यामुळे हमीभावाने खरेदीसाठी अडचणी

Crop Insurance : शेतकऱ्यांना विक्रमी पीकविमा

Heavy Rain : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील चार मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT