Agriculture  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Technology : अत्याधुनिक तंत्रज्ञानाने वेळ, पैसा, श्रमाची बचत होईल

Latest Agriculture News : आशिया खंडातील कृषिक्षेत्रामध्ये ऑटोमेशन सुधारण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे गरजेचे आहे.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatrapati Sambhaji Nagar News : ‘‘परिसंवादात मांडलेले विचार, शास्त्रीय विश्‍लेषण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या वेळ, पैसा आणि श्रमाची बचत होईल. यासाठी शासनाकडे एक भरीव आराखडा सादर करण्यास मदत होईल,’’ असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी व्यक्त केले.

आशिया खंडातील कृषिक्षेत्रामध्ये ऑटोमेशन सुधारण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शेतीतील ऑटोमेशन वाढीस लागण्यासाठी ‘एशियन असोसिएशन फॉर ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग, ‘एमजीएम’ आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.

जगभरातील एकूण ४६ शास्त्रज्ञांनीयात आपले विचार मांडले. या परिसंवादात देश -विदेशातील ११० प्रतिनिधींनी भाग घेतला. ‘‘भारतीय अर्थव्यवस्था सदृढ करण्यासाठी कृषिक्षेत्रात ऑटोमेशन अंत्यत गरजेचे आहे,’’ असे ‘एमजीएम’ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी या वेळी सांगितले.

उद्‍घाटनपर समारंभात बोलताना ‘कृषिक्षेत्रातील ऑटोमेशन आणि काळाची गरज’ यावर ‘एमजीएम’चे उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव यांनी विचार व्यक्त केले.

एमजीएम हिल्सचे कार्यकारी अधिकारी डॉ. प्रवीण सूर्यवंशी, प्रा. डॉ. गजेंद्र सिंग, डॉ. उदय खोडके, सय्यद इस्माईल, डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. किरण जाधव आदींचे मार्गदर्शन लाभले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Mustard : जीएमला परवानगी दिली तर तेलबिया उत्पादन वाढेल; जीएमला परवानगी देण्याची उद्योगांची मागणी

MPKV Rahuri : महात्मा फुले कृषी विद्यापीठाला युवक महोत्सवात दोन सुवर्णपदके

Sangli Vote Percentage : मतदानाचा टक्का वाढला; सांगलीत फायदा कोणाला?

Assembly Election Voting : अहिल्यानगर जिल्ह्यात विधानसभेला मतदानात वाढ

Leopard Terror : अजिंठा डोंगर परिसरात बिबट्यांची दहशत

SCROLL FOR NEXT