Cotton Production Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Production : आधुनिक लागवड तंत्रातून वाढेल कापसाची उत्पादकता

Cotton Cultivation : राज्यातील कपाशीची उत्पादकता देशाच्या उत्पादकतेपेक्षा ३० टक्क्यांनी कमी आहे. राज्यात कापसाखालील मोठ्या प्रमाणात क्षेत्र कोरडवाहू आहे. पावसाचा अनियमितपणा, योग्य लागवड पद्धतींचा अभाव, किडी- रोगांचा प्रादुर्भाव आदी परिस्थितीत कपाशीची उत्पादकता वाढविण्यासाठी लेखात टिप्सस्वरूपात केलेले आधुनिक लागवड तंत्रज्ञान मार्गदर्शन फायदेशीर ठरेल.

Team Agrowon

डॉ. खिजर स. बेग, डॉ. अरविंद पांडागळे, डॉ. बस्वराज वि. भेदे

Cotton Crop : कापूस या पिकासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीची गरज असते. लागवड मध्यम ते भारी जमिनीमध्ये करावी. हलक्या जमिनीत लागवड केल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते.

फेरपालट -पीकपद्धतीप्रमाणे बागायती लागवडीमध्ये गहू, भुईमूग ही पिके घेतलेल्या शेतात, तर कोरडवाहू क्षेत्रात ज्वारी, सोयाबीन ही पिके घेतलेल्या शेतात कापसाचे पीक घ्यावे.

वाणाची निवड- बाजारात उपलब्ध असणाऱ्या वाणांतून योग्य वाण निवडताना खालील बाबी विचारात घ्याव्यात.

-हा वाण रस शोषण करणाऱ्या किडी- रोगांना सहनशील असावा. ज्यामुळे फवारण्यांची संख्या कमी झाल्यामुळे कीड - रोग व्यवस्थापनावरील खर्च कमी करता येईल.

-कोरडवाहूसाठी वाण पाण्याचा ताण सहन करणारा असावा.

-सघन लागवडीसाठी आटोपशीर ठेवण (उंची व फांद्यांची लांबी कमी) असणारा असावा.

-अधिक वाढ असणारा वाण सघन लागवडीमध्ये उपयुक्त राहणार नाही.

-आपल्या भागात अधिक उत्पादन देणारा असावा. त्याचे धाग्याचे गुणधर्म सरस असावेत. ज्यामुळे बाजारभाव अधिक मिळेल.

वाणाची निवड

कोरडवाहू लागवडीसाठी कमी (१४०-१५० दिवस) ते मध्यम (१५०-१६० दिवस) कालावधीचा, तर बागायतीसाठी बीटी वाणाचा कालावधी १६० ते १८० दिवस असावा. बोंडाचा आकार कोरडवाहूसाठी मध्यम (३ ते ४ ग्रॅम), तर बागायतीसाठी मोठा (४ ग्रॅमपेक्षा जास्त) असावा.

लागवडीची वेळ- कपाशीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर लागवडीच्या वेळेवर अवलंबून असते. मराठवाड्यामध्ये पूर्वहंगामी (बागायती) कापूस पिकाची ठिबक सिंचन पद्धतीने लागवड १ ते ७ जून या काळात (तापमान ३९ अंशांपेक्षा कमी झाल्यावर) करावी, तर कोरडवाहू लागवड मॉन्सूनचा ७५-१०० मिमी पाऊस झाल्यावर करावी.

लागवडीचे अंतर लागवड प्रकार बागायती कोरडवाहू

१) मराठवाडा पारंपरिक पद्धत ६ बाय एक फूट ४ बाय १.५ फूट

किंवा ५ बाय १ फूट.

जोड ओळ ४-२ बाय १ फूट

सघन ------- ३ बाय १ फूट

२) विदर्भ ------ ४ बाय ३ फूट ३ बाय २ फूट

३) पश्‍चिम महाराष्ट्र व खानदेश ४ बाय २ फूट मध्यम

जमीन- ३ बाय २ फूट.

३ बाय ३ फूट भारी जमीन- ३ बाय ३ फूट.

बीज प्रक्रिया

बुरशीनाशक- स्युडोमोनास फ्लुरोसन्स १० ग्रॅम किंवा कार्बेंडाझिम ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे (मर व करपा रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी)

जिवाणूसंवर्धके- अ‍ॅझॅटोबॅक्टर (नत्र स्थिरीकरणासाठी) व स्फुरद विद्राव्य करणारे जिवाणू (अविद्राव्य स्फुरद विद्राव्य करण्यासाठी). मात्रा- द्रव स्वरूपातील- १० मिलि प्रति किलो बियाणे.

बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यानंतरच जिवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी.

आंतरपिके- फायदेशीर पद्धती

कापूस + मूग (१:१)

कापूस + उडीद (१:१)

कापूस + सोयाबीन (१:१)

रुंद ओळींमध्ये कापूस + मूग (१:२)

कापूस + तूर (४-६:१ किंवा ६-८:२)

कापूस + ज्वारी + तूर + ज्वारी (६:१:२:१)

सघन लागवड पद्धत

लागवड अंतर : ९० × ३० सेंमी (३ × १ फूट)

वाण - फक्त आटोपशीर ठेवण (फांद्यांची लांबी आणि उंची कमी) असणारेच वाण निवडावे.

वाढनियंत्रकाचा वापर- क्लोरमेक्वाट क्लोराइड या वाढ नियंत्रकाची पाते व फुले लागताना दोन वेळा जमिनीत ओल असताना फवारणी करणे आवश्यक. यासाठी १२ मिलि प्रति १० लिटर पाणी असे त्याचे प्रमाण वापरावे.

सघन लागवडीसाठी रासायनिक खतांची मात्रा २५ टक्के जास्त (१५०:७५:७५ नत्र, स्फुरद व पालाश किलो प्रति हेक्टर) वापरावी.

एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन :

-सेंद्रिय खते- कोरडवाहू लागवडीसाठी पाच टन शेणखत तर बागायतीसाठी १० टन शेणखत प्रति हेक्टर

-बागायती व कोरडवाहूसाठी रासायनिक तसेच विद्राव्य खतांच्या मात्रा, विभागणी व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर यांचे वेळापत्रक संबंधित लेखक तज्ज्ञांकडून घेता येईल.

तण नियंत्रण व्यवस्थापन

लागवडीपासून ३० दिवसांपर्यंत पीक तणमुक्त ठेवावे. दोन वेळा निंदणी व ३ ते ४ वेळा वखरणी करावी.

तणनाशके :

१) उगवणीपूर्व- पेंडीमिथॅलीन ३० ईसी २.५ ते ३.३ लिटर प्रति हेक्टर (२५ ते ३३ मिली प्रति १० लिटर पाणी) - लागवडीनंतर परंतु उगवणीपूर्वी ओलसर जमिनीवर समप्रमाणात फवारावे. फवारणीसाठी हेक्टरी एकहजार लिटर पाणी वापरावे.

२) उगवणीपश्‍चात- पायरीथायोबॅक सोडिअम ६ टक्के अधिक क्विझॉलफॉप इथाइल ४ टक्के एमईसी (लेबल क्लेम) - ६२५ मिलि प्रति हेक्टर- लागवडीनंतर २१ ते २८ दिवस किंवा तणे २-४ पानावर असताना वापरावे, फवारणीसाठी हेक्टरी ५०० लिटर पाणी वापरावे.

कीड नियंत्रण

-कापसाच्या पऱ्हाट्या व अवशेषाची शेतात, बांधावर व गावात साठवण करू नये.

-दीर्घ कालावधीच्या वाणांची लागवड करू नये.

-पीक फेरपालट करावी.

-शिफारशीपेक्षा अधिक प्रमाणात नत्राचा वापर टाळावा.

-मूग, उडीद, सोयाबीन, चवळी, झेंडू, मका, ज्वारी, राळा, भगर, एरंडी आदी आंतरपिके घ्यावीत.

-कडुनिंबाच्या बिया (निंबोळी) जमा करून वाळवून ठेवाव्यात.

संपर्क - डॉ. खिजर स. बेग, ७३०४१२७८१०, डॉ. अरविंद पांडागळे, ७५८८५८१७१३

(डॉ. बेग कापूस संशोधन केंद्र, नांदेड येथे कापूस विशेषज्ञ, डॉ. पांडागळे सहायक कृषिविद्यावेत्ता तर डॉ. भेदे सहायक कीटकशास्त्रज्ञ आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

MNS Protest : शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसह मनसेचा ‘पन्नगेश्‍वर’वर मोर्चा

Paddy Transplantation : पावसाअभावी सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवड रखडली

Mulching Farming : शेतकऱ्यांची पॉली मल्चिंगला मागणी

Groundnut Sowing : खानदेशात भुईमूग लागवडीस गती

SCROLL FOR NEXT