Ratnagiri Farmers Crop Loss : रत्नागिरी जिल्ह्यात ४ हजारांवर शेतकऱ्यांचे ७७२ हेक्टरचे नुकसान
Crop Damage : ऑक्टोबर महिन्यातील मुसळधार पावसाने जिल्ह्यातील खरीप पिकांचे मोठे नुकसान केले आहे. भात आणि नाचणी पिकांवर सर्वाधिक फटका बसला असून, ४००० हून अधिक शेतकऱ्यांच्या ७७२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अंदाजे ६५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.