Cotton Market Rate : परभणीत कापसाच्या दरातील घसरण कायम

Cotton Bazar Bhav : मागील आठवड्याच्या तुलनेत सेलू बाजार समितीमधील कापसाचे किमान दर ३०० रुपये तर कमाल दर ७२० रुपयांनी कमी झाले आहेत.
Cotton Market
Cotton Market Agrowon

Parbhani News : जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठांत कापसाच्या दरातील घसरण कायम आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत सेलू बाजार समितीमधील कापसाचे किमान दर ३०० रुपये तर कमाल दर ७२० रुपयांनी कमी झाले आहेत. सोमवारी (ता. २२) सेलू बाजार समितीत कापसाला प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ७२२० तर ७१४० रुपये सर्वसाधारण दर मिळाले.

मानवत तसेच इतर बाजारपेठांमधील कापसाच्या दरात घसरण सुरूच आहे. त्यामुळे दर वाढीच्या अपेक्षेने कापूस विक्री न केलेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. मागील महिनाभरापासून परभणी जिल्ह्यात कापसाच्या दरात सुधारणा नाही. किमान व कमाल दरात घसरण सुरूच आहे. किमान दर प्रतिक्वंटल ६००० रुपयापर्यंत तर कमाल दर ७००० रुपयापर्यंत कमी झाले आहेत.

Cotton Market
Cotton Market: बाजारातील कापूस आवक कधी कमी होईल?

किमान ९००० रुपये किंवा त्याहून अधिक दराच्या प्रतीक्षेतील अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे. गेल्या दोन महिन्यांत झालेला अवकाळी पाऊस तसेच बाजार समित्यांच्या निवडणुकांमुळे खरेदीचे व्यवहार बंद राहिल्याने दर कमी झाले असल्याचे सांगितले जात होते. परंतु पाऊस उघडला आहे. निवडणुका संपल्या आहेत. परंतु कापसाच्या दरात सुधारणा होत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

सेलू बाजार समितीत शनिवारी (ता. २०) कापसाला प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ७३२० रुपये तर सरासरी ७२३० रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. १९) प्रतिक्विंटल किमान ६४०० ते कमाल ७४७० रुपये तर सरासरी ७४२० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. १८) प्रतिक्वंटल किमान ६८०० ते कमाल ७६७५ रुपये तर सरासरी ७५६० रुपये दर मिळाले.

Cotton Market
Cotton Market: भारतापेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस महाग?

मानवत बाजार समितीत शुक्रवारी (ता. १९) कापसाची ४७५० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ६३०० ते कमाल ७४०० रुपये तर सरासरी ७२७५ रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. १८) प्रतिक्विंटल किमान ६४०० ते कमाल ७५१५ रुपये तर सरासरी ७४२५ रुपये दर मिळाले.

किमान तसेच कमाल दरात किंचित चढउतार होत आहे. परंतु फारशी सुधारणा होत नाही. दरात आणखी घसरण होऊन नुकसान सोसण्यापेक्षा अनेक शेतकरी सध्याच्या दरात कापूस विक्रीसाठी आणत असल्याने आवक वाढली आहे. परंतु अपेक्षित दर न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा अपेक्षांवर पाणी पडले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com