Rain  Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Rain Update : कोकण, विदर्भात पावसाच्या मध्यम सरी

Maharashtra Rain Forecast : राज्यात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि विदर्भात पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी कोसळत आहे.

Team Agrowon

Pune News : राज्यात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि विदर्भात पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी कोसळत आहे. घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी पडत आहे.

शुक्रवारी (ता. २७) सकाळी आठ वाजेपर्यंत ताम्हिणी घाटमाथ्यावर सर्वाधिक १८० मिलिमीटर पाऊस पडला. तर धरणक्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. तर सततच्या पावसामुळे पिकांच्या नुकसानीत वाढ होत असल्याने शेतकरी अडचणीत येत आहे.

कोकणात मागील पाच ते सहा दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. या पावसामुळे भात खाचरे भरली आहेत. परंतु जोरदार पावसामुळे भात पिकांचे नुकसान होत आहे. तर काही ठिकाणी उभी पिके पडत आहेत. ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाचे प्रमाण अधिक आहे.

पालघरमधील बोईसर येथे ९१ मिलिमीटर पाऊस पडला. तर रत्नागिरीतील भरणे येथे ८८ मिलिमीटर पाऊस झाला. या पावसामुळे नद्या अजूनही भरून वाहत असल्याने धरणे तुडूंब भरली आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर कमीअधिक आहे. ताम्हिणी, डुंगरवाडी, शिरगाव या घाटमाथ्यावर १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला.

खानदेशातील धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला. धुळेतील दुसाणे येथे ८५ मिलिमीटर पाऊस पडला. तर जळगाव जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. मध्य महाराष्ट्रातील पुण्यातील वेल्हा येथे ११९ मिलिमीटर, साताऱ्यातील महाबळेश्वर येथे ९८ मिलिमीटर, लामज येथे ६० मिलिमीटर पाऊस झाला. नाशिकमध्येही पावसाच्या तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडल्या. तर सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला.

नगरमधील राहाता, नगर तालुका, पाथर्डी, राहुरी तालुक्यात हलक्या सरी होत्या. तर दिवसभर उकाडा जाणवत होता. या पावसामुळे काही पिकांना दिलासा मिळत असला तरी अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण कायम आहे. पुणे जिल्ह्यात धरणक्षेत्रात पावसाचा जोर आहे.

तसेच शहर परिसरातही अधूनमधून पाऊस सुरूच आहे. काही धरणक्षेत्रांत पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे भरली आहेत. त्यापैकी २० धरणांतून विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

मराठवाड्यात पावसाच्या तुरळक सरी पडत आहे. मागील आठवड्यात दमदार पाऊस पडला. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. परंतु आता या भागात पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे शेतीकामांना सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी सोयाबीन, बाजरी पिके काढणीच्या कामांना वेग आला आहे.

विदर्भात अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत पावसाच्या काही ठिकाणी जोरदार सरी पडल्या. अमरावतीतील कुऱ्हा येथे ६५ मिलिमीटर पाऊस झाला. तर वर्ध्यातील झाडसी येथे ७८ मिलिमीटर, नागपूरमधील कोडामेंडी, खाट येथे सर्वाधिक १२८ मिलिमीटर, तर हिंगणा, वानाडोंगरी, खापरी, गुमगाव येथे १०७ मिलिमीटर पाऊस झाला.

भंडाऱ्यातील तुमसर, मिटेवणी येथे ७६ मिलिमीटर, गोंदियातील कोसामतोंडी येथे ८१ मिलिमीटर पाऊस झाला. या पावसामुळे कापूस, तूर पिकांना आधार मिळत असला तरी काही ठिकाणी सततच्या पावसामुळे या पिकांचे मुळे सडण्यास सुरुवात झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT