Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Fish Farming : कृषी विभागातर्फे शेती, मत्स्यपालनाचे धडे

Integrated Farming : पंचायत समिती सुधागड पाली, उमेद आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Team Agrowon

Raigad News : सुधागड तालुक्यातील नाडसूर येथील आदर्श ग्राम वैतागवाडी येथे पारंपरिक व आधुनिक शेतीत समन्वय साधत भातलागवड व मत्स्यपालनाचे प्रात्यक्षिक आणि शेतकरी मार्गदर्शन शिबिर नुकतेच यशस्वीरीत्या पार पडले.

पंचायत समिती सुधागड पाली, उमेद आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे आयोजन तालुका कृषी अधिकारी दयावंती कदम व गटविकास अधिकारी लता बबन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या वेळी उपकृषी अधिकारी दिनेश पांढरे, तालुका अभियान व्यवस्थापक अभिनय पाटील, प्रभाग समन्वय अधिकारी अनुराधा गायकवाड, सहाय्यक कृषी अधिकारी जगदीश कंठाळे, मयूर शिंदे, अतुल क्षीरसागर तसेच शेतकरी महिला बचत गट, ग्रामसंघ, कृषी सखी, माजी सरपंच, तंटामुक्त अध्यक्ष, ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद

या उपक्रमाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, अनेकांनी शाश्वत शेती व मत्स्यपालनाचे संधी क्षेत्र म्हणून या माहितीचा लाभ घेतला. गावात अशा प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यशाळा नियमित घ्याव्यात, अशी मागणीही शेतकऱ्यांतून पुढे आली.

मार्गदर्शनाचे विषय

शेतकऱ्यांना भातलागवडीत पारंपरिक पट्टा व यांत्रिक पद्धतीतील फरक, जीवामृत तयार करणे, नैसर्गिक शेतीसाठी गिरीपुष्प खत, नरेगा योजनेंतर्गत मत्स्यपालन आणि एकात्मिक शेतीबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी दयावंती कदम यांनी परंपरागत शेतीच्या तुलनेत यांत्रिक पद्धतीचे फायदे, खर्च-उत्पन्न ताळमेळ, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादनात वाढ व एकात्मिक शेतीची दिशा यावर विशेष भर दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Project Storage : सातपुड्यातील प्रकल्प भरू लागले

Bajari Sowing : खानदेशात बाजरी पीक जोमात

Crop Insurance : शेतकऱ्यांना मिळणार १२७ कोटींची भरपाई

Employment Guarantee Scheme : रोहयोअंतर्गत केवळ ६० प्रकरणांना मंजुरी लक्ष्य १५००

Maratha Reservation : नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा जरांगे पाटील यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT