Farmer App Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Mobile Application: राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोबाइल ॲप: शेतीसंबंधी योजनांची माहिती एका क्लिकवर!

Maharashtra Agriculture App: शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांची आणि शेतीविषयक माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य सरकार ‘शेतकरी मोबाइल ॲप’ विकसित करत आहे. या ॲपमधून शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठांचे संशोधन, कृषी विभागाच्या सवलती, तसेच शेतीतील जोखमींवर उपाय यासंबंधी माहिती मिळणार आहे.

बाळासाहेब पाटील

Mumbai News: राज्यातील अल्प, अत्यल्प आणि बागायती शेतकऱ्यांना शेतीतील जोखीम कमी करण्यासाठी आणि विविध योजनांसह शेतीसंबंधीची सर्व माहिती मोबाइल ॲपवर देण्यासाठी तीन जलद कृती दलाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या ॲपचा पहिला टप्पा १ एप्रिल, तर दुसरा टप्पा १ ते डिसेंबरदरम्यान सुरू होणार आहे.

राज्यात मोठ्या शेतकऱ्यांबरोबर अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. या शेतकऱ्यांपर्यंत कृषी विद्यापीठांचे संशोधन, कृषी विभागाच्या योजना आणि सवलतींची माहिती पोहोचत नसते. त्यामुळे जानेवारी, २०२५ मध्ये एक खिडकी योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी एकच मोबाइल ॲप तयार करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती.

या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. या अहवालातील शिफारशींनुसार शेतकऱ्यांना शेतीतील जोखीम कमी करण्यासाठीची माहिती निरंतरपणे देण्याची गरज असल्याचे नमूद केले आहे

तीन टास्क फोर्समध्ये २२ अधिकारी

शेतकरी अॅप निर्मितीसाठी तीन टास्क फोर्समध्ये २२ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या टास्क फोर्समध्ये कृषी सहसंचालक विस्तार (२), स्मार्टचे अतिरिक्त प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे कृषी विद्यावेत्ता, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांचे विस्तार व शिक्षण संचालक या टास्क फोर्सचे सदस्य आहेत.

ॲप तयार करण्यात कृषी विद्यापीठांचा महत्त्वाचा वाटा असल्याने राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समन्वयासाठी कृती गट तयार करण्यात आला आहे. यामध्ये सहा अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. टास्क फोर्सने जमा केलेल्या तांत्रिक माहिती पडताळणी आणि वर्गीकरणासाठी नऊ अधिकाऱ्यांचा कृती गट तयार केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

SCROLL FOR NEXT