Agriculture AI App And Portal : शेतीसाठी येणार आता ए आय ॲप आणि पोर्टल

Team Agrowon

शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच कृषी योजनांची एकत्र माहिती देण्यासाठी एकखिडकी योजनेच्या धर्तीवर फार्मर ॲप आणि इंटरफेस पोर्टल तयार करण्यात येणार आहे.

Agriculture AI App, Portal | Agrowon

यासाठी राज्य सरकारने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून १५ दिवसांत ही समिती अहवाल सादर करणार आहे.

Agriculture AI App, Portal | Agrowon

शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात येणारे पोर्टल कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (एआय)वर आधारित असेल.

Agriculture AI App, Portal | Agrowon

शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन शेतीविषयक कामांत अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतो. तसेच शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती अनेकदा मिळण्यात अडचणी येतात.

Agriculture AI App, Portal | Agrowon

शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ देण्यात येत असतात. या सगळ्यांची माहिती त्यांना एका क्लिकवर मिळावी यासाठी राज्य सरकार आता फार्मर ॲप आणि इंटरफेस पोर्टल विकसित करणार आहे.

Agriculture AI App, Portal | Agrowon

या ॲप आणि पोर्टलमधून योजनांची माहिती, योजनाचा लाभ, कृषी विषयक योजनांच्या लाभासाठी अर्ज आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Agriculture AI App, Portal | Agrowon

या ॲप आणि पोर्टलसाठी नेमण्यात आलेली समिती सरकारच्या विविध योजनांची सविस्तर माहिती घेणार आहे. तसेच कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनाअंतर्गत येणाऱ्या घटकांची अथवा बाबींची, लाभांची माहिती घेणार आहे.

Agriculture AI App, Portal | Agrowon

Sugarcane Water Management : असं करा उसासाठी पाण्याचं नियोजन

आणखी पाहा...