AI Farmer App: ‘एआय’वर आधारित शेतकरी ॲप आणि पोर्टल लवकरच

AI-Powered Portal: शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच कृषी योजनांची एकत्र माहिती देण्यासाठी एकखिडकी योजनेच्या धर्तीवर फार्मर ॲप आणि इंटरफेस पोर्टल तयार करण्यात येणार आहे.
AI Farmer App
AI Farmer AppAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच कृषी योजनांची एकत्र माहिती देण्यासाठी एकखिडकी योजनेच्या धर्तीवर फार्मर ॲप आणि इंटरफेस पोर्टल तयार करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून १५ दिवसांत ही समिती अहवाल सादर करणार आहे.

AI Farmer App
Agriculture AI : भविष्यातील शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढणार

शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात येणारे पोर्टल कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (एआय)वर आधारित असेल. शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन शेतीविषयक कामांत अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतो. तसेच शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती अनेकदा मिळण्यात अडचणी येतात.

AI Farmer App
Agricultural Ai: शेतीत ‘एआय’ वापराची व्यवहार्यता तपासावी; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे अधिकाऱ्यांना निर्देश

शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ देण्यात येत असतात. या सगळ्यांची माहिती त्यांना एका क्लिकवर मिळावी यासाठी राज्य सरकार आता फार्मर ॲप आणि इंटरफेस पोर्टल विकसित करणार आहे. या ॲप आणि पोर्टलमधून योजनांची माहिती, योजनाचा लाभ, कृषी विषयक योजनांच्या लाभासाठी अर्ज आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या ॲप आणि पोर्टलसाठी नेमण्यात आलेली समिती सरकारच्या विविध योजनांची सविस्तर माहिती घेणार आहे. तसेच कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनाअंतर्गत येणाऱ्या घटकांची अथवा बाबींची, लाभांची माहिती घेणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com