Ram Satpute vs Praniti Shinde Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur Constituency : सोलापुरात आमदार प्रणिती शिंदे विरुद्ध आमदार राम सातपुते

Election Candidate Updates : सोलापूर लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदे विरुद्ध आमदार राम सातपुते अशी थेट लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर लोकसभेसाठी या आधीच काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांनी प्रचाराची एक फेरीही पूर्ण केली. पण विरोधी भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते, पद्मश्री मिलिंद कांबळे, माजी खासदार अमर साबळे आदी नावांची नुसतीच चर्चा सुरु होती. पण अखेरीस आमदार राम सातपुते यांच्या नावाची घोषणा झाली. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे विरुद्ध आमदार राम सातपुते अशी थेट लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले. \

सोलापूर लोकसभा ही अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. गेली दहा वर्षे या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व आहे. मागच्या निवडणुकीत खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या जातीच्या दाखल्यामुळे भाजप अडचणीत आली. त्यामुळे यंदा उमेदवारी देण्यासाठी भाजपने सावध पावले उचलली.

त्यासाठी स्थानिक उमेदवाराचा शोध घेऊनही तो मिळत नव्हता. त्यामुळे बाहेरील उमेदवार आयात करावा लागतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. या आधी या मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना अनुक्रमे अॅड. शरद बनसोडे आणि त्यानंतर खासदार डॉ. महास्वामी यांनी जोरात लढत देत, दोन वेळा त्यांना पराभूत केले होते.

त्यामुळे भाजपची प्रतिष्ठा या मतदारसंघात पणाला लागलेली आहे. तर शिंदे यांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी काँग्रेससह स्वतः त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे या मैदानात उतरल्याने चुरस निर्माण झाली होती. पण भाजपकडून उमेदवारच ठरत नसल्याने वेगवेगळ्या चर्चांना नुसता ऊत आला होता. पण अखेरीस जिल्ह्यातीलच माळशिरस मतदारसंघाचे आमदार राम सातपुते यांच्या नावाची घोषणा झाल्याने दोन्ही आमदारांमध्ये चुरशीची लढत होणार, हे स्पष्ट झाले आहे.

माढ्याचे अद्याप ठरेना

जिल्ह्यातील माढा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नावाची घोषणा झालेली आहे. पण भाजपमधूनच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या गटाने त्यांच्या उमेदवारीला विरोध केल्याने पेच निर्माण झाला आहे. मोहिते-पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी थेट प्रचाराला सुरवात करत मतदारसंघाचा अंदाज घ्यायला सुरवात केली आहे.

विरोधी पक्षाकडून कोण, हे अद्याप ठरलेले नसले, तरी भाजपमधील या गोंधळाकडेच त्यांचे लक्ष आहे. पण तूर्तास तरी शेकापचे सांगोल्याचे युवा नेते अनिकेत देशमुख किंवा नाराज मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात घेऊन पवार याठिकाणी मोहिते पाटील यांना उतरवतील, अशीही चर्चा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT